S M L

पेस, लॉही आज फायनलमध्ये झुंजणार

5 जूनफ्रेंच ओपनमध्ये भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गतविजेता लिएंडर पेस आणि लुका लॉही आज फायनलमध्ये 2रे सीडींग असलेल्या झिमॉनिच आणि डॅनियल नेस्टारशी भिडणार आहेत. गेल्या काही वर्षात हे दोन्ही प्रतिस्पर्धी अनेक वेळा एकमेकांसमोर आले आहेत, आणि त्यांनी एकमेकांना टफ फाईटही दिली आहे.गेल्या वर्षी पेस-लॉही जोडीने झिमॉनिच-नॅस्टरचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. पेसने आत्तापर्यंत 11 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. आज जर त्याने विजेतेपद पटकावले तर तो भारताचा सर्वात जास्त ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरेल. महेश भूपतीने आत्तापर्यंत सर्वात जास्त ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत.समंथा आणि फ्रान्सिस्का फायनलमध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज महिलांची सेमी फायनल रंगणार आहे, ती समंथा स्टॉसर आणि फ्रान्सिस्का स्किआव्होने यांच्यात. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची फायनल गाठण्याची दोघांचीही ही पहिलीच वेळ आहे. स्टॉसरने जस्टीन हेनन, सेरना विल्यम्स आणि येलेना यान्कोविचसारख्या टॉपर खेळाडूंना हरवत फायनल गाठली आहे. त्यामुळे फायनलमध्ये तिचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. दोघीही आत्तापर्यंत पाच वेळा समोरासमोर आल्या आहेत. त्यात स्टॉसरने चार वेळा विजय मिळला आहे. आता क्ले कोर्टवर नक्की कोण बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 11:29 AM IST

पेस, लॉही आज फायनलमध्ये झुंजणार

5 जून

फ्रेंच ओपनमध्ये भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गतविजेता लिएंडर पेस आणि लुका लॉही आज फायनलमध्ये 2रे सीडींग असलेल्या झिमॉनिच आणि डॅनियल नेस्टारशी भिडणार आहेत.

गेल्या काही वर्षात हे दोन्ही प्रतिस्पर्धी अनेक वेळा एकमेकांसमोर आले आहेत, आणि त्यांनी एकमेकांना टफ फाईटही दिली आहे.

गेल्या वर्षी पेस-लॉही जोडीने झिमॉनिच-नॅस्टरचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. पेसने आत्तापर्यंत 11 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. आज जर त्याने विजेतेपद पटकावले तर तो भारताचा सर्वात जास्त ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरेल. महेश भूपतीने आत्तापर्यंत सर्वात जास्त ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत.

समंथा आणि फ्रान्सिस्का फायनलमध्ये

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज महिलांची सेमी फायनल रंगणार आहे, ती समंथा स्टॉसर आणि फ्रान्सिस्का स्किआव्होने यांच्यात. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची फायनल गाठण्याची दोघांचीही ही पहिलीच वेळ आहे.

स्टॉसरने जस्टीन हेनन, सेरना विल्यम्स आणि येलेना यान्कोविचसारख्या टॉपर खेळाडूंना हरवत फायनल गाठली आहे. त्यामुळे फायनलमध्ये तिचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.

दोघीही आत्तापर्यंत पाच वेळा समोरासमोर आल्या आहेत. त्यात स्टॉसरने चार वेळा विजय मिळला आहे. आता क्ले कोर्टवर नक्की कोण बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close