S M L

बाळासाहेबांचे खरे वाघ असतील सत्तेतून बाहेर पडा -जयंत पाटील

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2017 09:54 PM IST

बाळासाहेबांचे खरे वाघ असतील सत्तेतून बाहेर पडा -जयंत पाटील

09 फेब्रुवारी : बाळासाहेबांचे खरे गूण जर उद्धव ठाकरे यांच्यात असतील आणि हे जर खरे वाघ असतील तर, 23 तारखेला शिवसेना राज्यसरकारचा पाठिंबा काढून घेईल. मात्र तसे झाले नाही तर मात्र तो कागदी वाघ आहे हे सिद्ध होईल अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील  यांनी केली.सांगली जिल्ह्यातील ढवळी येथील राष्ट्रवादीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी पाटील हे बोलत होते.

भाजपाच संख्याबळ म्हणजे राजकीय सूज आहे. तिकडे गेलेले परत कधी इकडे येतील हे कळणार पण नाही, असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडनवीस यांची जुनी भाषण मी तुम्हाला आणून देतो तुम्ही वाचा. ती भाषण वाचली की या ठिकाणी भाजपाचे डिपॉझिट जर जप्त झालं नाही, तर माझं नाव बदलून टाका, असा इशारा देखील माजीमंत्री जयंत पाटील यांनी दिला.

शिवसेना जेंव्हा भाजपचा पाठिंबा काढून घेईल, मग भाजपामध्ये गेलेल्याना पाश्चाताप होईल, अस सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, भाजपाच्या लाटेचा काळ ओसरला. लाट असताना सुद्धा भाजपचे राज्यात स्पष्ट बहुमत येईल इतके आमदार निवडून आले नाहीत. आणि जे आमदार निवडून आले त्यातील अर्धे निम्मे हे आयात केलेले नेते होते असंही पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 09:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close