S M L

एसईझेडचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ

5 जूनएमआयडीसी आणि एसईझेडसाठी शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या आयुष्याची नेहमीच होरपळ सुरू असते. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारातील शेतकर्‍यांचीही अशीच बिकट अवस्था झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची 700 एकर जमीन सरकारने एमआयडीसीसाठी ताब्यात घेतली. एकरी साडे आठ ते नऊ लाख रूपये असा दर या शेतकर्‍यांच्या जमिनीसाठी देण्याचे मान्य केले होते. मात्र आता टीडीआर आणि इतर कारणे पुढे करत दीड ते दोन लाख रूपये कमी देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.सरकारच्या या मनमानी भूमिकेला विरोध करण्याचे गावकर्‍यांनी ठरवले आहे. दहा दिवसांत सरकाने या जमिनींचा एकरकमी मोबदला दिला नाही, तर शेतजमिनी न देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही या गावकर्‍यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 12:36 PM IST

एसईझेडचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ

5 जून

एमआयडीसी आणि एसईझेडसाठी शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या आयुष्याची नेहमीच होरपळ सुरू असते. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारातील शेतकर्‍यांचीही अशीच बिकट अवस्था झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांची 700 एकर जमीन सरकारने एमआयडीसीसाठी ताब्यात घेतली. एकरी साडे आठ ते नऊ लाख रूपये असा दर या शेतकर्‍यांच्या जमिनीसाठी देण्याचे मान्य केले होते. मात्र आता टीडीआर आणि इतर कारणे पुढे करत दीड ते दोन लाख रूपये कमी देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सरकारच्या या मनमानी भूमिकेला विरोध करण्याचे गावकर्‍यांनी ठरवले आहे. दहा दिवसांत सरकाने या जमिनींचा एकरकमी मोबदला दिला नाही, तर शेतजमिनी न देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही या गावकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close