S M L

निवसर स्टेशनजवळ ट्रॅकला धोका

5 जूनपावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. कोकण रेल्वे मार्गावरील निवसर स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅक खचत असल्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे. यावर उपाय म्हणून यंदा कोकण रेल्वेने पर्यायी ट्रॅकचे काम सुरू केले आहे. मात्र हे कामही अजून पूर्ण झालेले नाही. शिवाय हा नवीन ट्रॅक पुनर्वसन केलेल्या घरांच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे खोदकाम झाल्याने गावकर्‍यांना घरासमोरील रस्तेही बंद झाले आहेत. याबाबत पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी रेल्वे आणि महसूल प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. हा ट्रॅक तयार करताना येथील पूर्वीच्या नाल्यांनाही दुसर्‍या बाजूने वळवण्यात आले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना पुराच्या पाण्याचाही धोका आहे. कोकण रेल्वेच्या या कारभाराविरोधात आता निवसरच्या सरपंचांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 12:46 PM IST

निवसर स्टेशनजवळ ट्रॅकला धोका

5 जून

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. कोकण रेल्वे मार्गावरील निवसर स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅक खचत असल्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे.

यावर उपाय म्हणून यंदा कोकण रेल्वेने पर्यायी ट्रॅकचे काम सुरू केले आहे. मात्र हे कामही अजून पूर्ण झालेले नाही. शिवाय हा नवीन ट्रॅक पुनर्वसन केलेल्या घरांच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे खोदकाम झाल्याने गावकर्‍यांना घरासमोरील रस्तेही बंद झाले आहेत.

याबाबत पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी रेल्वे आणि महसूल प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

हा ट्रॅक तयार करताना येथील पूर्वीच्या नाल्यांनाही दुसर्‍या बाजूने वळवण्यात आले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना पुराच्या पाण्याचाही धोका आहे.

कोकण रेल्वेच्या या कारभाराविरोधात आता निवसरच्या सरपंचांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close