S M L

हरियालीचा हिरवा वसा...

शची मराठे, मुंबई5 जून'झाडे लावा, झाडे जगवा', असा नारा देत अनेकजण वृक्षसंगोपनासाठी झटत असतात. असाच एक अनोखा प्रयत्न हरियाली नावाची संस्था करत आहे. मुंबईभरातील शाळा, बचत गट, जेष्ठ नागरिक यांना एकत्र घेऊन ही संस्था वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया गोळा करते. दरवर्षी हरियालीचे पूनमचंद संघवी आणि त्यांचे साथीदार मुंबई-ठाण्यात फिरुन जवळपास 50 किलो बिया गोळा करतात. 100 बियांची पाकिटे करून पावसाळ्याच्या सुरुवातीला पंढरपूरकडे वाटचाल करणार्‍या वारकर्‍यांना ती वाटली जातात. वारकरी ती रस्त्याच्या कडेला किंवा आपल्या, शेता-बांधावर नेऊन पेरतात.चिंच, गुलमोहर, बहावा यांसारख्या वृक्षांच्या बिया गोळा करण्याचं काम हरियाली ही संस्था गेली 14 वर्षे करत आहे. येत्या 25, 27 जून रोजी या सगळ्या वृक्षांच्या बिया मुंबई- आग्रा हायवे वर पेरण्यात येणार आहेत.अनेकजण हे सोने वेचण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. कोणास ठाऊक, काही वर्षांनी कुठेतरी एखादे झाड तुम्हाला भेटेल जे तुमच्या ओंजळीतील बीपासून उगवलेले असेल...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 01:17 PM IST

हरियालीचा हिरवा वसा...

शची मराठे, मुंबई

5 जून

'झाडे लावा, झाडे जगवा', असा नारा देत अनेकजण वृक्षसंगोपनासाठी झटत असतात. असाच एक अनोखा प्रयत्न हरियाली नावाची संस्था करत आहे.

मुंबईभरातील शाळा, बचत गट, जेष्ठ नागरिक यांना एकत्र घेऊन ही संस्था वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया गोळा करते.

दरवर्षी हरियालीचे पूनमचंद संघवी आणि त्यांचे साथीदार मुंबई-ठाण्यात फिरुन जवळपास 50 किलो बिया गोळा करतात.

100 बियांची पाकिटे करून पावसाळ्याच्या सुरुवातीला पंढरपूरकडे वाटचाल करणार्‍या वारकर्‍यांना ती वाटली जातात. वारकरी ती रस्त्याच्या कडेला किंवा आपल्या, शेता-बांधावर नेऊन पेरतात.

चिंच, गुलमोहर, बहावा यांसारख्या वृक्षांच्या बिया गोळा करण्याचं काम हरियाली ही संस्था गेली 14 वर्षे करत आहे. येत्या 25, 27 जून रोजी या सगळ्या वृक्षांच्या बिया मुंबई- आग्रा हायवे वर पेरण्यात येणार आहेत.

अनेकजण हे सोने वेचण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. कोणास ठाऊक, काही वर्षांनी कुठेतरी एखादे झाड तुम्हाला भेटेल जे तुमच्या ओंजळीतील बीपासून उगवलेले असेल...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close