S M L

घरातील कचर्‍याचं बनवा खत...

दीप्ती राऊत, नाशिक5 जूनपर्यावरण संरक्षण हे आपल्या सर्वांना पटलेलं तत्व असतं. पण शहरात, फ्लॅटमध्ये राहाताना आपण काय करणार हा प्रश्नही पडतो. नाशिकच्या 'निर्मल ग्राम'नं यावर अत्यंत प्रॅक्टीकल उत्तर शोधलंय ते खतपेटीचं.नाशिकमधील संध्या नावरेकरांच्या घरात कचर्‍याचे दोन डबे आहेत... सुक्या कचर्‍यासाठी एक आणि ओल्या कचर्‍यासाठी दुसरा. तुम्ही म्हणाल यात काय नवीन... तर यातलं नाविन्य आहे ते त्या या कचर्‍याचं पुढे काय करतात याच्यात... त्यांनी एक पेटीच तयार केली आहे. ती कचरा पेटीही आहे आणि खतपेटीही...या पेटीचे दोन कप्पे आहेत. त्याच्यामधील पार्टीशन वॉलला काही छिद्रं आहेत. एका कप्प्यात कचरा टाकायचा. 10-12 दिवसांनी त्यात गांडुळं सोडली की ती तिथेच खत तयार करतात.निर्मल ग्राम संस्थेच्या माध्यमातून तयार झालेल्या या कचरापेटीत एका महिन्यात एका कुटुंबामागे तब्बल 12 किलो खत तयार होऊ शकतं.विशेष म्हणजे या कचर्‍यापासून तयार झालेल्या खताची दुर्गंधीही येत नाही. कारण, कचर्‍यावर गांडुळं लगेच प्रक्रिया सुरू करतात. यावर बसवलेल्या जाळ्यांमुळे माश्यांचाही त्रास होत नाही... उलट मिळणारं खतच खूप चांगल्या क्वालीटीचं असतं...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 06:18 PM IST

घरातील कचर्‍याचं बनवा खत...

दीप्ती राऊत, नाशिक

5 जून

पर्यावरण संरक्षण हे आपल्या सर्वांना पटलेलं तत्व असतं. पण शहरात, फ्लॅटमध्ये राहाताना आपण काय करणार हा प्रश्नही पडतो. नाशिकच्या 'निर्मल ग्राम'नं यावर अत्यंत प्रॅक्टीकल उत्तर शोधलंय ते खतपेटीचं.

नाशिकमधील संध्या नावरेकरांच्या घरात कचर्‍याचे दोन डबे आहेत... सुक्या कचर्‍यासाठी एक आणि ओल्या कचर्‍यासाठी दुसरा. तुम्ही म्हणाल यात काय नवीन... तर यातलं नाविन्य आहे ते त्या या कचर्‍याचं पुढे काय करतात याच्यात...

त्यांनी एक पेटीच तयार केली आहे. ती कचरा पेटीही आहे आणि खतपेटीही...

या पेटीचे दोन कप्पे आहेत. त्याच्यामधील पार्टीशन वॉलला काही छिद्रं आहेत. एका कप्प्यात कचरा टाकायचा. 10-12 दिवसांनी त्यात गांडुळं सोडली की ती तिथेच खत तयार करतात.

निर्मल ग्राम संस्थेच्या माध्यमातून तयार झालेल्या या कचरापेटीत एका महिन्यात एका कुटुंबामागे तब्बल 12 किलो खत तयार होऊ शकतं.

विशेष म्हणजे या कचर्‍यापासून तयार झालेल्या खताची दुर्गंधीही येत नाही.

कारण, कचर्‍यावर गांडुळं लगेच प्रक्रिया सुरू करतात. यावर बसवलेल्या जाळ्यांमुळे माश्यांचाही त्रास होत नाही... उलट मिळणारं खतच खूप चांगल्या क्वालीटीचं असतं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close