S M L

भोपाळकांडातील 7 जणांना शिक्षा

7 जूनजगाला हादरवून सोडणार्‍या भोपाळ गॅस दुर्घटना प्रकरणाचा आज जब्बल 25 वर्षांनी निकाल लागला. यात7 आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंडही करण्यात आला आहे. वायूगळती झालेल्या कार्बाईड कंपनीला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.त्यानंतर त्यांना प्रत्येकी 25 हजारांचा जामीनही मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे प्रमुख आरोपी वॉरेन अँडरसन यांचे नाव दोषींमध्ये नाही. 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशके बनवणार्‍या कारखान्यात मिथाईल आयसोसायनाइट वायूची गळती झाली. या दुर्घटनेत 25 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. भारतातीलच नव्हे तर जगातील ही मोठी औद्योगिक दुर्घटना होती. दुर्घटनेच्या पहिल्याच रात्री अडीच हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. या वायूगळतीतून जे बचावले, त्यांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आले. त्या दुर्घटनेचे व्रण शरीर आणि मनावर घेऊन आजही हजारो लोक जगत आहेत. न्याय आणि मदतीसाठी आजही हजारो लोकांचा लढा सुरू आहे. दोषींची नावे पुढीलप्रमाणे - तेव्हाचे यूसीआयएलचे चेअरमन केशव महिंद्रायूसीआयएलचे चेअरमन विजय गोखलेयूसीआयएलचे उपाध्यक्ष किशोर कामदारमॅनेजर जे. मुकुंद प्रोडक्शन मॅनेजर एस. पी. चौधरी प्लॅन्ट सुपरीटेंडंट के. व्ही. शेट्टी प्रोडक्शन असो. एस. आय. कुरेशीया निकालाबाबत पीडित समाधानी नाहीत. कोर्टाबाहेर या निकालाचा निषेध करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 09:05 AM IST

भोपाळकांडातील 7 जणांना शिक्षा

7 जून

जगाला हादरवून सोडणार्‍या भोपाळ गॅस दुर्घटना प्रकरणाचा आज जब्बल 25 वर्षांनी निकाल लागला.

यात7 आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंडही करण्यात आला आहे.

वायूगळती झालेल्या कार्बाईड कंपनीला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्यानंतर त्यांना प्रत्येकी 25 हजारांचा जामीनही मंजूर करण्यात आला.

विशेष म्हणजे प्रमुख आरोपी वॉरेन अँडरसन यांचे नाव दोषींमध्ये नाही.

2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशके बनवणार्‍या कारखान्यात मिथाईल आयसोसायनाइट वायूची गळती झाली. या दुर्घटनेत 25 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते.

भारतातीलच नव्हे तर जगातील ही मोठी औद्योगिक दुर्घटना होती. दुर्घटनेच्या पहिल्याच रात्री अडीच हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले.

या वायूगळतीतून जे बचावले, त्यांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आले.

त्या दुर्घटनेचे व्रण शरीर आणि मनावर घेऊन आजही हजारो लोक जगत आहेत. न्याय आणि मदतीसाठी आजही हजारो लोकांचा लढा सुरू आहे.

दोषींची नावे पुढीलप्रमाणे -

तेव्हाचे यूसीआयएलचे चेअरमन केशव महिंद्रा

यूसीआयएलचे चेअरमन विजय गोखले

यूसीआयएलचे उपाध्यक्ष किशोर कामदार

मॅनेजर जे. मुकुंद

प्रोडक्शन मॅनेजर एस. पी. चौधरी

प्लॅन्ट सुपरीटेंडंट के. व्ही. शेट्टी

प्रोडक्शन असो. एस. आय. कुरेशी

या निकालाबाबत पीडित समाधानी नाहीत. कोर्टाबाहेर या निकालाचा निषेध करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 09:05 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close