S M L

'माजी महापौरांनीच घडवली दंगल'

7 जूनमिरज येथे गणेशोत्सवाच्या वेळी झालेल्या दंगलीला सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवानच जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला आहे. कृष्णप्रकाश यांची नागपूरला बदली झाली आहे. नागपूरला रुजू होण्यापूर्वी झालेल्या निरोप समारंभातच त्यांनी हा गौप्यस्फोट केला. दरम्यान मैनुद्दीन बागवान 'नॉट रिचेबल' झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. गणेश उत्सवात अफजलखान वधाची कमान लावण्यावरून दंगल झाली होती. या दंगलीमागे काही राजकीय नेते असल्याचे गृहमंत्रीही म्हणाले होते. जोधा-अकबर सिनेमावरून या अगोदर दंगल झाली होती.त्यावेळी राजकीय दबावापोटीच मैनुद्दीन यांना अटक झाली नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जयंत पाटील आणि आर. आर. पाटील या सांगलीतील दोघा मंत्र्यांमधील भांडण असल्याचा आरोप भाजप आणि सेनेच्या नेत्यांनी केला आहे. मौनुद्दीन बागवान आणि कृष्णप्रकाश यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात - मौनुद्दीन बागवान, माजी महापौर सांगलीपूर्वीचा काँग्रेस कार्यकर्ता तिकीट नाकारल्यानंतर विकास महाआघाडीमध्ये सहभागनगरसेवक म्हणून निवड विकास महाआघाडी -राष्ट्रवादी-भाजप आणि अन्य व्यापारी महासंघ यांचा मिळून तयार झाली आहेसांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडमहापौर म्हणून सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्णमैनुद्दीन बागवान ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याजवळचा कार्यकर्तादंगलीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदाचा राजीनामा दिलाकृष्णप्रकाश, एस.पी. , सांगली2007मध्ये सांगलीचे एस. पी. म्हणून नेमणूकसांगली-मिरजमधील मटका, दारु अड्डे चालवणार्‍यांवर कडक कारवाईअनेक कामचुकार अधिकार्‍यांना निलंबीत केलेयापूर्वी अमरावतीचे एस. पी. म्हणीन उत्तम कामसामाजिक संघटना आणि दंगल कृती समिती यांचा एस. पी. कृष्णप्रकाश यांच्या बदलीला विरोध होता. दंगलीचे सत्य बाहेर येईपर्यंत बदली करू नये असा लोकांचा आग्रह होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 11:35 AM IST

'माजी महापौरांनीच घडवली दंगल'

7 जून

मिरज येथे गणेशोत्सवाच्या वेळी झालेल्या दंगलीला सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवानच जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला आहे.

कृष्णप्रकाश यांची नागपूरला बदली झाली आहे. नागपूरला रुजू होण्यापूर्वी झालेल्या निरोप समारंभातच त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

दरम्यान मैनुद्दीन बागवान 'नॉट रिचेबल' झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

गणेश उत्सवात अफजलखान वधाची कमान लावण्यावरून दंगल झाली होती. या दंगलीमागे काही राजकीय नेते असल्याचे गृहमंत्रीही म्हणाले होते.

जोधा-अकबर सिनेमावरून या अगोदर दंगल झाली होती.

त्यावेळी राजकीय दबावापोटीच मैनुद्दीन यांना अटक झाली नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जयंत पाटील आणि आर. आर. पाटील या सांगलीतील दोघा मंत्र्यांमधील भांडण असल्याचा आरोप भाजप आणि सेनेच्या नेत्यांनी केला आहे.

मौनुद्दीन बागवान आणि कृष्णप्रकाश यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात -

मौनुद्दीन बागवान, माजी महापौर सांगली

पूर्वीचा काँग्रेस कार्यकर्ता

तिकीट नाकारल्यानंतर विकास महाआघाडीमध्ये सहभाग

नगरसेवक म्हणून निवड

विकास महाआघाडी -राष्ट्रवादी-भाजप आणि अन्य व्यापारी महासंघ यांचा मिळून तयार झाली आहे

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून दोन वेळा निवड

महापौर म्हणून सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण

मैनुद्दीन बागवान ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याजवळचा कार्यकर्ता

दंगलीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदाचा राजीनामा दिला

कृष्णप्रकाश, एस.पी. , सांगली

2007मध्ये सांगलीचे एस. पी. म्हणून नेमणूक

सांगली-मिरजमधील मटका, दारु अड्डे चालवणार्‍यांवर कडक कारवाई

अनेक कामचुकार अधिकार्‍यांना निलंबीत केले

यापूर्वी अमरावतीचे एस. पी. म्हणीन उत्तम काम

सामाजिक संघटना आणि दंगल कृती समिती यांचा एस. पी. कृष्णप्रकाश यांच्या बदलीला विरोध होता. दंगलीचे सत्य बाहेर येईपर्यंत बदली करू नये असा लोकांचा आग्रह होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close