S M L

कृत्रिम पावसाचा प्रयोग यंदा मुंबईत नाही

7 जूनआज सात जून...म्हणजे राज्यात मान्सून दाखल होण्याचा दिवस....पण अजूनही राज्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. पण त्यात फारसे यश आले नव्हते.त्यामुळे यंदा असा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जर यावर्षीही पुरेसा पाऊस झाला नाहीतर महापालिका राज्यसरकारच्या मदतीने काही तरी मार्ग काढेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली. पण पाण्याची बचत करण्यासाठी आता महापालिकेने काही उपाय योजले आहेत. महापालिकेने आता आपल्या मालकीच्या बगिच्यांना पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच जवळपास 300 सार्वजनिक शौचालयांचाही पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच बोअरवेल्स आणि विहिरींचा वापरही वाढवण्यात आला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 01:04 PM IST

कृत्रिम पावसाचा प्रयोग यंदा मुंबईत नाही

7 जून

आज सात जून...म्हणजे राज्यात मान्सून दाखल होण्याचा दिवस....पण अजूनही राज्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही.

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. पण त्यात फारसे यश आले नव्हते.त्यामुळे यंदा असा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

जर यावर्षीही पुरेसा पाऊस झाला नाहीतर महापालिका राज्यसरकारच्या मदतीने काही तरी मार्ग काढेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.

पण पाण्याची बचत करण्यासाठी आता महापालिकेने काही उपाय योजले आहेत.

महापालिकेने आता आपल्या मालकीच्या बगिच्यांना पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच जवळपास 300 सार्वजनिक शौचालयांचाही पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

तसेच बोअरवेल्स आणि विहिरींचा वापरही वाढवण्यात आला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close