S M L

प.महाराष्ट्रात कीटकनाशक फवारणी शेतमजुरांसाठी ठरतेय प्राणघातक

20 ऑक्टोबर, सोलापूरपश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर भागात कीटकनाशक फवारणीच्यावेळी होणार्‍या विषबाधेमुळे शेतमजुरांच्या बळींची संख्या वाढत आहे. या हंगामात 13 शेतमजूर दगावले आहेत. पिकाच्या संरक्षणासाठी असणारी कीटकनाशकं आता शेतकर्‍याच्या जीवाला घातक ठरू लागली आहेत. फवारणी करणार्‍या शेतमजुराच्या बळींची संख्या दिवसंेदिवस वाढू लागली आहेत. कीटकनाशक फवारणारा शेतमजूर शंभर रुपयांसाठी आपले आयुष्य पणाला लावतो. शेतमालक या मजुरांना सुरक्षेचं कोणतंही साधन पुरवत नाही. औषध फवारताना काळजी घेण्याची गरज ना शेतमालकाला वाटते ना मजुरांना. पिकांवरची कीटकं लवकर नष्ट करण्यासाठी औषधाची मात्रा जास्त वापरली जाते. त्याचा परिणाम फवारणी करणार्‍या शेतमजुरांवर जास्त होतो. ' शेतकरी फवारताना काळजी घेत नाही. औषधावरील सुचना वाचत नाही. दिलेले प्रमाण आणि काळजी घेतली तर अपघात होणार नाहीत ' , असं सोलापूरचे कृषीतज्ज्ञ प्रा. जे. बी माळी यांनी सांगितलं. शेतमजुराच्या आरोग्याकडं कोणाचंही लक्ष नाही. विषबाधेला बळी ठरलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला पैसे देऊन प्रकरण दाबलं जातं किंवा प्रसंगी धाक दाखवून गप्पही बसवलं जातं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 12:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close