S M L

भाजपला दणका, नाशिकमध्ये 'स्वाभिमानी शेतकरी' शिवसेनेसोबत

Samruddha Bhambure | Updated On: Feb 15, 2017 05:26 PM IST

भाजपला दणका, नाशिकमध्ये 'स्वाभिमानी शेतकरी' शिवसेनेसोबत

15 फेब्रुवारी :  जरी राज्यात आणि इतर महापालिकेत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत असली तरी नाशिकमध्ये मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या या भूमिकेनं भाजपला चांगलाच दणका बसला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपसोबत युती करायचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. पण जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपनं शेट्टी यांना विश्वासात घेतलं नाही. त्यांच्याशी जागावाटपाची साधी चर्चाही केली नाही आहे. त्यात, ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसंच कांद्याच्या आंदोलनांबाबत भाजपविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close