S M L

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जाळले

7 जूनमूल होत नाही म्हणून विवाहितेचा खून करुन तिला जाळल्याची घटना बीडमधील केज तालुक्यातील मुंडेवाडी इथे घडली. सासरच्या लोकांनी तिचा खून करून घरही पेटवून दिले. या महिलेच्या डोक्यावर कोयत्याचे वार होते, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. मेडिकल रिपोर्टनुसार तपास करू, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टेममध्ये कारण स्पष्ट नसल्याने तपासाच्या दिशेवर परिणाम होईल, असे विवाहितेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई टोकले यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 02:32 PM IST

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जाळले

7 जून

मूल होत नाही म्हणून विवाहितेचा खून करुन तिला जाळल्याची घटना बीडमधील केज तालुक्यातील मुंडेवाडी इथे घडली. सासरच्या लोकांनी तिचा खून करून घरही पेटवून दिले.

या महिलेच्या डोक्यावर कोयत्याचे वार होते, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मेडिकल रिपोर्टनुसार तपास करू, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टेममध्ये कारण स्पष्ट नसल्याने तपासाच्या दिशेवर परिणाम होईल, असे विवाहितेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलीस आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई टोकले यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close