S M L

रिक्त पदांमुळे कॉलेजांवर गदा

8 जूनप्राचार्य आणि प्राध्यापकांची रिक्त पदे न भरल्याने राज्यातील अनेक कॉलेजांवर मान्यता रद्द होण्याची गदा आली आहे.राज्यातील नागपूर, पुणे आणि सोलापूर विद्यापीठातील काही कॉलेजेसची मान्यता प्रशासनाने रद्द केली होती. त्यात तिन्ही विद्यापीठातील साधारणत: साडेसातशे कॉलेजेसवर कारवाई करण्यात आली. या कॉलेजेसमध्ये प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांकडून वारंवार सूचना करूनही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. शेवटी या कॉलेजेसची नावे विद्यापीठांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकली आणि ती वेबसाईटवरून प्रसिद्ध केली. पण आज सुप्रीम कोर्टाने या कॉलेजेसना दिलासा दिला आहे. येत्या सहा महिन्यांत ही रिक्त पदे भरण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता संस्थांनी घ्यावी, असेही कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 01:49 PM IST

रिक्त पदांमुळे कॉलेजांवर गदा

8 जून

प्राचार्य आणि प्राध्यापकांची रिक्त पदे न भरल्याने राज्यातील अनेक कॉलेजांवर मान्यता रद्द होण्याची गदा आली आहे.

राज्यातील नागपूर, पुणे आणि सोलापूर विद्यापीठातील काही कॉलेजेसची मान्यता प्रशासनाने रद्द केली होती. त्यात तिन्ही विद्यापीठातील साधारणत: साडेसातशे कॉलेजेसवर कारवाई करण्यात आली.

या कॉलेजेसमध्ये प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांकडून वारंवार सूचना करूनही ही पदे भरण्यात आलेली नाहीत.

शेवटी या कॉलेजेसची नावे विद्यापीठांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकली आणि ती वेबसाईटवरून प्रसिद्ध केली.

पण आज सुप्रीम कोर्टाने या कॉलेजेसना दिलासा दिला आहे. येत्या सहा महिन्यांत ही रिक्त पदे भरण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे.

यासोबतच विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता संस्थांनी घ्यावी, असेही कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close