S M L

मतदानासाठी आमदार नजरकैदेत

9 जूनविधानपरिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीत आपली मते फुटू नये याची तयारी सर्व पक्षांनी केली आहे.शिवसेनेने आपल्या 45 आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भाईंदरच्या साई पॅलेसमध्ये आणि वसईच्या रॉयल गार्डन या रिझॉर्टमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. हे आमदार संध्याकाळी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतील. त्या नंतर आज रात्री या सर्व 45 आमदारांना दक्षिण मुंबईतील एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही आपले आमदार सुरक्षित स्थळी हलवले आहेत. काँग्रसचे आणि सहयोगी अपक्ष आमदार ताज हॉटेलवर असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची ओबेरॉय हॉटेलवर बैठक झाल्याचेही समजते.काँग्रेसची फिल्डींगविधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे चारही उमेदवार निवडून आणण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. त्यासाठी आपल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासोबतच विरोधी बाकावरच्या आमदारांची मते फोडण्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डींग लावली आहे. पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूयात - काँग्रेस- 100 ( 82 अधिकृत + 12 अपक्ष + 5 इतर + 1 अँग्लो इंडियन सदस्य)राष्ट्रवादी काँग्रेस - 73 (62 अधिकृत + 11 अपक्ष)शिवसेना- 46 (45 अधिकृत + विवेक पंडीत)भाजप - 46मनसे - 13शेकाप - 4 सपा - 3 जनसुराज्य पक्ष - 2माकप 1लोकसंग्राम 1उमेदवाराला निवडुन येण्यासाठी 27 मतांचा कोटा असेल, त्यानुसार मतदान होईल. कोणाला किती मते हवीत, त्यावर एक नजर टाकूयात - काँग्रेसला चौथ्या उमेदवारासाठी 8 मतेराष्ट्रवादीला तिसर्‍या उमेदवारासाठी 9 मतेशिवसेनेला दुसर्‍या उमेदवारासाठी 8 मतेभाजपला दुसर्‍या उमेदवारासाठी 8 मते

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 10:40 AM IST

मतदानासाठी आमदार नजरकैदेत

9 जून

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीत आपली मते फुटू नये याची तयारी सर्व पक्षांनी केली आहे.

शिवसेनेने आपल्या 45 आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भाईंदरच्या साई पॅलेसमध्ये आणि वसईच्या रॉयल गार्डन या रिझॉर्टमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे.

हे आमदार संध्याकाळी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतील. त्या नंतर आज रात्री या सर्व 45 आमदारांना दक्षिण मुंबईतील एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल.

तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही आपले आमदार सुरक्षित स्थळी हलवले आहेत. काँग्रसचे आणि सहयोगी अपक्ष आमदार ताज हॉटेलवर असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची ओबेरॉय हॉटेलवर बैठक झाल्याचेही समजते.

काँग्रेसची फिल्डींग

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे चारही उमेदवार निवडून आणण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. त्यासाठी आपल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासोबतच विरोधी बाकावरच्या आमदारांची मते फोडण्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डींग लावली आहे.

पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूयात -

काँग्रेस- 100 ( 82 अधिकृत 12 अपक्ष 5 इतर 1 अँग्लो इंडियन सदस्य)

राष्ट्रवादी काँग्रेस - 73 (62 अधिकृत 11 अपक्ष)

शिवसेना- 46 (45 अधिकृत विवेक पंडीत)

भाजप - 46

मनसे - 13

शेकाप - 4

सपा - 3

जनसुराज्य पक्ष - 2

माकप 1

लोकसंग्राम 1

उमेदवाराला निवडुन येण्यासाठी 27 मतांचा कोटा असेल, त्यानुसार मतदान होईल. कोणाला किती मते हवीत, त्यावर एक नजर टाकूयात -

काँग्रेसला चौथ्या उमेदवारासाठी 8 मते

राष्ट्रवादीला तिसर्‍या उमेदवारासाठी 9 मते

शिवसेनेला दुसर्‍या उमेदवारासाठी 8 मते

भाजपला दुसर्‍या उमेदवारासाठी 8 मते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close