S M L

पुण्यातील मेट्रो अडकली महापालिकांच्या वादात

9 जूनपुण्यातील मेट्रो प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील मतभेदांमुळेच होऊ शकत नाही, असे दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे एमडी ई श्रीधरन यांनी सांगितले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, असे पत्रही त्यांनी मुख्यमत्र्यांना लिहिले आहे.प्रोफेशनल पार्टी ऑफ इंडियाने ई श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्पाच्या चर्चासत्रात उपस्थित राहण्याची विनंती केली होती. या विनंतीला उत्तर देताना श्रीधरन यांनी हा खुलासा केला आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत डीएमआरसीने सर्वेक्षण आणि प्रकल्प तयार केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण दोन महापालिकांमधील खर्चाच्या मुद्द्यावरून झालेल्या मतभेदामुळे प्रकल्प सुरू होत नसल्याचे श्रीधरन यांनी म्हटले आहे. या प्रकल्पासाठी 2009 मध्ये 6 हजार कोटी एवढा खर्च अपेक्षीत होता. तर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हा खर्च 8 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाजही डीएमआरसीने व्यक्त केला होता

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 12:09 PM IST

पुण्यातील मेट्रो अडकली महापालिकांच्या वादात

9 जून

पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील मतभेदांमुळेच होऊ शकत नाही, असे दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे एमडी ई श्रीधरन यांनी सांगितले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, असे पत्रही त्यांनी मुख्यमत्र्यांना लिहिले आहे.

प्रोफेशनल पार्टी ऑफ इंडियाने ई श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्पाच्या चर्चासत्रात उपस्थित राहण्याची विनंती केली होती. या विनंतीला उत्तर देताना श्रीधरन यांनी हा खुलासा केला आहे.

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत डीएमआरसीने सर्वेक्षण आणि प्रकल्प तयार केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण दोन महापालिकांमधील खर्चाच्या मुद्द्यावरून झालेल्या मतभेदामुळे प्रकल्प सुरू होत नसल्याचे श्रीधरन यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पासाठी 2009 मध्ये 6 हजार कोटी एवढा खर्च अपेक्षीत होता. तर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हा खर्च 8 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाजही डीएमआरसीने व्यक्त केला होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close