S M L

त्र्यंबकेश्वरमध्येही युतीत काडीमोड

9 जूनऔरंगाबादनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्येही युतीचा संसार तुटला आहे. पण इथे निमित्त झाले ते सेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसोबत हातमिळवणी करण्याचे. येत्या 15 जूनला त्र्यंबकेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. या ठिकाणी भाजप 4, सेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 आणि इतर अपक्ष असे बलाबल आहे. अपक्षांच्या मदतीने भाजपचे पारडे जड होते. मात्र, अचानक शिवसेनेच्या नगरसेविका आशा लोखंडे आणि लक्ष्मी पवार यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपच्या हातून नगराध्यक्षपद निसटण्याची वेळ आली आहे. युतीचा धर्म मोडल्याने हा वाद थेट मातोश्रीवर पोहोचला आहे. मात्र, सेनेच्या नाशिक जिल्हा नेत्यांच्या आशीर्वादानेच हे झाल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 01:14 PM IST

त्र्यंबकेश्वरमध्येही युतीत काडीमोड

9 जून

औरंगाबादनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्येही युतीचा संसार तुटला आहे. पण इथे निमित्त झाले ते सेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसोबत हातमिळवणी करण्याचे.

येत्या 15 जूनला त्र्यंबकेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. या ठिकाणी भाजप 4, सेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 आणि इतर अपक्ष असे बलाबल आहे.

अपक्षांच्या मदतीने भाजपचे पारडे जड होते. मात्र, अचानक शिवसेनेच्या नगरसेविका आशा लोखंडे आणि लक्ष्मी पवार यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

त्यामुळे भाजपच्या हातून नगराध्यक्षपद निसटण्याची वेळ आली आहे.

युतीचा धर्म मोडल्याने हा वाद थेट मातोश्रीवर पोहोचला आहे. मात्र, सेनेच्या नाशिक जिल्हा नेत्यांच्या आशीर्वादानेच हे झाल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close