S M L

नाशिकमधील छोट्या शास्त्रज्ञाचा नासाकडून गौरव

दीप्ती राऊत, नाशिक 9 जूनअंतराळातील मानवी वस्ती... जगभरातील शास्त्रज्ञांपुढील एक चॅलेंज. एका छोट्या शास्त्रज्ञालाही याच चॅलेंजने झपाटले. आणि या झपाटलेल्या छोट्या शास्त्रज्ञाला नासाचे यंदाचे बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड मिळाले आहे.प्रशांत लोणीकर असे या सहावीत शिकणार्‍या 12 वर्षांच्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खुल्या झालेल्या माहितीच्या जगाचा प्रशांतने उपयोग करून घेतला. इथेच नासाच्या स्पेस सेटलमेंट डिझाईन कॉन्टेस्टची त्याला माहिती मिळाली. आणि अंतराळातील मानवी वस्ती कशी असेल..? प्रशांतच्या डोक्यातील प्रश्नांनी वेग घेतला...याच वेगळेपणाची दखल घेत प्रशांतच्या प्रोजेक्टला नासाचे पहिले पारितोषिक मिळाले. शिवाय शिकागो इथे भरलेल्या इंटर नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधीही त्याला मिळाली.बज एल्ट्रीन, चंद्रावर उतरलेला दुसरा माणूस. त्यांनी प्रशांतसोबत फोटो काढला. या प्रवासात प्रशांतच्या पालकांचाही वाटा मोठा आहे.आता प्रशांतचे पुढील प्लॅन्सही तयार आहेत. त्याला शास्त्रज्ञच बनायचे आहे. इस्रोमध्ये काम करायचे आहे...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 02:38 PM IST

नाशिकमधील छोट्या शास्त्रज्ञाचा नासाकडून गौरव

दीप्ती राऊत, नाशिक

9 जून

अंतराळातील मानवी वस्ती... जगभरातील शास्त्रज्ञांपुढील एक चॅलेंज. एका छोट्या शास्त्रज्ञालाही याच चॅलेंजने झपाटले. आणि या झपाटलेल्या छोट्या शास्त्रज्ञाला नासाचे यंदाचे बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड मिळाले आहे.

प्रशांत लोणीकर असे या सहावीत शिकणार्‍या 12 वर्षांच्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खुल्या झालेल्या माहितीच्या जगाचा प्रशांतने उपयोग करून घेतला. इथेच नासाच्या स्पेस सेटलमेंट डिझाईन कॉन्टेस्टची त्याला माहिती मिळाली. आणि अंतराळातील मानवी वस्ती कशी असेल..? प्रशांतच्या डोक्यातील प्रश्नांनी वेग घेतला...

याच वेगळेपणाची दखल घेत प्रशांतच्या प्रोजेक्टला नासाचे पहिले पारितोषिक मिळाले. शिवाय शिकागो इथे भरलेल्या इंटर नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधीही त्याला मिळाली.

बज एल्ट्रीन, चंद्रावर उतरलेला दुसरा माणूस. त्यांनी प्रशांतसोबत फोटो काढला.

या प्रवासात प्रशांतच्या पालकांचाही वाटा मोठा आहे.

आता प्रशांतचे पुढील प्लॅन्सही तयार आहेत. त्याला शास्त्रज्ञच बनायचे आहे. इस्रोमध्ये काम करायचे आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close