S M L

मते द्या, निलंबन मागे घ्या...

9 जूनविधान परिषद निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. घोडेबाजार तेजीत आहे. कोण कुठे जाणार, कोण फुटणार, कोण पक्षाचा व्हीप मानणार, या सगळ्याची चर्चा आता सुरू आहे. पण या सगळ्यात महत्त्वाची आहेत ती मनसेची मते... आणि मनसेची ही महत्त्वाची मते कुणाच्या पारड्यात जाणार याचा निर्णय पक्का झाला आहे. अर्थात हा निर्णय नाही तर हे डीलच पक्के झाले आहे. हे डील आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी. या डीलचा फॉर्म्युलाही आघाडीने ठरवला आहे. मनसेची मते दोन्ही काँग्रेस विभागून घेणार आहे. त्या बदल्यात, मनसेच्या चार आमदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे.डील एवढ्यावरच थांबलेले नाही, तर या व्यवहारात मोठे अर्थकारणही होत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 03:24 PM IST

मते द्या, निलंबन मागे घ्या...

9 जून

विधान परिषद निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. घोडेबाजार तेजीत आहे. कोण कुठे जाणार, कोण फुटणार, कोण पक्षाचा व्हीप मानणार, या सगळ्याची चर्चा आता सुरू आहे. पण या सगळ्यात महत्त्वाची आहेत ती मनसेची मते...

आणि मनसेची ही महत्त्वाची मते कुणाच्या पारड्यात जाणार याचा निर्णय पक्का झाला आहे. अर्थात हा निर्णय नाही तर हे डीलच पक्के झाले आहे. हे डील आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी. या डीलचा फॉर्म्युलाही आघाडीने ठरवला आहे.

मनसेची मते दोन्ही काँग्रेस विभागून घेणार आहे. त्या बदल्यात, मनसेच्या चार आमदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे.

डील एवढ्यावरच थांबलेले नाही, तर या व्यवहारात मोठे अर्थकारणही होत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close