S M L

अँडरसनला आणण्यासाठी समिती

इंदिरा कन्नन, न्यूयॉर्क ; हेमेंदर, भोपाळ9 जूनवॉरेन अँडरसनला भारतात परत आणण्यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षते खाली त्यासाठीच एक समिती बनवण्यात आली आहे. पण अमेरिका अँडरसनला हस्तांतरित करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. भारताचा हा गुन्हेगार अमेरिकेत मात्र आलिशान जीवन जगत आहे. भोपाळ गॅसकांडातील हा मुख्य आरोपी सध्या अमेरिकेत न्यूयॉर्क जवळच्या ब्रिजहँप्टन या उपनगरात राहतो. आयबीएन नेटवर्कच्या टीमने त्याचे आलीशान घर शोधून काढले. पण तिथे आम्ही पोचलो, तेव्हा कळले की अँडरसनचे अमेरिकेतच फ्लोरिडामध्ये दुसरे घर आहे. 90 वर्षांचा अँडरसन फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क अशा दोन ठिकाणी वर्षांतले सहा-सहा महिने राहतो. पण खरा प्रश्न हा आहे की त्याला भारतात आणता येणार आहे का?'आयबीएन-लोकमत'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अँडरसनच्या हस्तांतरणासाठी परराष्ट्रमंत्रालयाने 2008 मध्ये अमेरिकेकडे विनंती केली होती. पण भोपाळ दुर्घटनेसाठी तो जबाबदार असल्याचा पुरावा मात्र देता आला नव्हता. त्यामुळे ती विनंती नाकारण्यात आली. म्हणून आता सरकारने पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली एका मंत्रिसमूहाची स्थापना केली आहे. अँडरसनच्या हस्तांतरणाची मुख्य जबाबदारी यांच्यावर असेल. दरम्यान, अमेरिकेने आतापर्यंत अँडरसनच्या हस्तांतरणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत, असे सीबीआयचे माजी प्रमुख रामराव यांनी म्हटले आहे. राव यांच्या या वक्तव्यामुळे प्रश्न निर्माण होतो की तेव्हाचे केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत होते का? जोवर अर्जुन सिंग आपले मौन सोडत नाहीत, तोवर या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 03:49 PM IST

अँडरसनला आणण्यासाठी समिती

इंदिरा कन्नन, न्यूयॉर्क ; हेमेंदर, भोपाळ

9 जून

वॉरेन अँडरसनला भारतात परत आणण्यासाठी आता केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षते खाली त्यासाठीच एक समिती बनवण्यात आली आहे. पण अमेरिका अँडरसनला हस्तांतरित करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. भारताचा हा गुन्हेगार अमेरिकेत मात्र आलिशान जीवन जगत आहे.

भोपाळ गॅसकांडातील हा मुख्य आरोपी सध्या अमेरिकेत न्यूयॉर्क जवळच्या ब्रिजहँप्टन या उपनगरात राहतो. आयबीएन नेटवर्कच्या टीमने त्याचे आलीशान घर शोधून काढले. पण तिथे आम्ही पोचलो, तेव्हा कळले की अँडरसनचे अमेरिकेतच फ्लोरिडामध्ये दुसरे घर आहे. 90 वर्षांचा अँडरसन फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क अशा दोन ठिकाणी वर्षांतले सहा-सहा महिने राहतो. पण खरा प्रश्न हा आहे की त्याला भारतात आणता येणार आहे का?

'आयबीएन-लोकमत'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अँडरसनच्या हस्तांतरणासाठी परराष्ट्रमंत्रालयाने 2008 मध्ये अमेरिकेकडे विनंती केली होती. पण भोपाळ दुर्घटनेसाठी तो जबाबदार असल्याचा पुरावा मात्र देता आला नव्हता. त्यामुळे ती विनंती नाकारण्यात आली. म्हणून आता सरकारने पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली एका मंत्रिसमूहाची स्थापना केली आहे. अँडरसनच्या हस्तांतरणाची मुख्य जबाबदारी यांच्यावर असेल.

दरम्यान, अमेरिकेने आतापर्यंत अँडरसनच्या हस्तांतरणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत, असे सीबीआयचे माजी प्रमुख रामराव यांनी म्हटले आहे.

राव यांच्या या वक्तव्यामुळे प्रश्न निर्माण होतो की तेव्हाचे केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत होते का? जोवर अर्जुन सिंग आपले मौन सोडत नाहीत, तोवर या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close