S M L

हिंगोलीतला सोनसांगवी तांडा विकासापासून दूर

20 ऑक्टोबर, हिंगोलीहिंगोली जिल्ह्यातल्या सोनसांगवी तांड्यावरचे धरणग्रस्त आजही यातना भोगत आहेत. गेल्या 45 वर्षांपासून सरकारचं दुर्लक्ष आहे. हिंगोली जिल्ह्यात 400 लोकसंख्या असलेल्या सोनसांगवी तांड्यावरचे लोक सध्या मरणयातना सहन करत आहेत. येलदरी धरणामुळं विस्थापित झालेल्या या तांड्याला कुठल्याच सुविधा आजपर्यंत मिळाल्या नाहीत. 1962 पासून आजही हा तांडा विकासापासून दूरच आहे.परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या येलदरी धरणात 1962 साली सोनसांगवी तांडा इथल्या शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या गेल्या आणि त्या बदल्यात एकरी अडीचशे रुपये इतका मोबदला दिला. मात्र आजपर्यंत या विस्थापितांना कुठल्याच सुविधा मिळाल्या नाहीत.1962 साली या गावात ग्रामपंचायत कार्यालय होतं. तिथं आता मातीचा ढिगाराच राहिलाय. तीन वर्षांपासून गावात 4 थीपर्यंत प्राथमिक शाळा सुरू झाली. मात्र पुढच्या शिक्षणासाठी गावातील एकही मुलगा अद्यापर्यंत गेला नाही. अंधार तर पाचवीलाच पुजलेला. सोनसांगवीच्या मरणयातना काही संपत नाहीत. दिवाळी आठवड्यावर आली आहे. मात्र सोयीसुविधांना वंचित असलेला सोनसांगवी तांडा अजूनही अंधार दूर होण्याचीच वाट पाहत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 04:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close