S M L

हज यात्रेसाठी मराठवाड्यातून गर्दी

9 जूनऑक्टोबर महिन्यापासून हज यात्रेला सुरुवात होते. मराठवाड्यातून या वर्षी 2 हजार 63 तर राज्यातून एकूण 8 हजार 831 यात्रेकरू जाणार आहेत. हज यात्रेला जाण्यासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील 8 हजार 221 भाविकांनी मुंबई इथे महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या कार्यालयात अर्ज केले होते. त्यापैकी सोडत पध्दतीने 2 हजार 63 भाविकांना हज यात्रेला जाता येणार आहे. तर प्रतीक्षा यादीत 77 भाविकांचा समावेश आहे. तसेच सतत सलग तीन वर्षे अर्ज करणार्‍या 271 भाविकांनाही यात्रेसाठी संधी मिळाली आहे. ज्यांचा नंबर लागला, त्यांना अर्ज आणि पासपोर्ट 4 जुलैपर्यंत हज कमिटीकडे पाठवावा लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 06:00 PM IST

हज यात्रेसाठी मराठवाड्यातून गर्दी

9 जून

ऑक्टोबर महिन्यापासून हज यात्रेला सुरुवात होते. मराठवाड्यातून या वर्षी 2 हजार 63 तर राज्यातून एकूण 8 हजार 831 यात्रेकरू जाणार आहेत.

हज यात्रेला जाण्यासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील 8 हजार 221 भाविकांनी मुंबई इथे महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या कार्यालयात अर्ज केले होते. त्यापैकी सोडत पध्दतीने 2 हजार 63 भाविकांना हज यात्रेला जाता येणार आहे. तर प्रतीक्षा यादीत 77 भाविकांचा समावेश आहे.

तसेच सतत सलग तीन वर्षे अर्ज करणार्‍या 271 भाविकांनाही यात्रेसाठी संधी मिळाली आहे. ज्यांचा नंबर लागला, त्यांना अर्ज आणि पासपोर्ट 4 जुलैपर्यंत हज कमिटीकडे पाठवावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close