S M L

एक्झिट पोल : मुंबईत शिवसेना मोठा पक्ष, पण बहुमत नाही ?

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2017 08:52 PM IST

एक्झिट पोल : मुंबईत शिवसेना मोठा पक्ष, पण बहुमत नाही ?

21 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप स्वबळावर मैदानात उतरली. आज मतदान संपलंय. त्यामुळे मुंबईकुणाची असा सवाल उपस्थितीत झालाय. अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलंय.

कौरव -पांडव ते पार औकात काढण्यापर्यंत रंगलेला शिवसेना आणि भाजपच्या 'सामन्या'चा फैसला आज मतपेटीत बंद झालाय. 23 तारखेला मतमोजणी होईल आणि मुंबईकुणाची हे निश्चित होईल. पण, अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईमध्ये एकूण 227 जागा आहेत.

या पोलनुसार शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यापाठोपाठ भाजप हा दुसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला 80 ते 88 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेसहा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. काँग्रेसला 30 ते 34 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल

मुंबई

- शिवसेना - 86 ते 92

- भाजप - 80 ते 88

- काँग्रेस - 30 ते 34

- मनसे - 5 ते 7

- राष्ट्रवादी - 3 ते 6

मुंबईत सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 31

राष्ट्रवादी काँग्रेस 13

काँग्रेस 52

शिवसेना 75

मनसे 28

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close