S M L

आठवले गट पडणार रिडालोसच्या बाहेर

10 जूनरामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष रिडालोसमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. रिडालोसमधील शेकापने विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. तर समाजवादी पार्टीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍या आघाडीने घेतलेल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. रिपब्लिकन पक्षाची वैचारिक भूमिकेच्या पातळीवर अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत रिडालोस तिसर्‍या आघाडीद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तसेच शिवसेना-भाजप युतीविरोधात लढली होती. आता शेकाप आणि समाजवादी पार्टीच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातवरण निर्माण झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2010 08:02 AM IST

आठवले गट पडणार रिडालोसच्या बाहेर

10 जून

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष रिडालोसमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे.

रिडालोसमधील शेकापने विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला. तर समाजवादी पार्टीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतला.

तिसर्‍या आघाडीने घेतलेल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. रिपब्लिकन पक्षाची वैचारिक भूमिकेच्या पातळीवर अडचण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत रिडालोस तिसर्‍या आघाडीद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तसेच शिवसेना-भाजप युतीविरोधात लढली होती.

आता शेकाप आणि समाजवादी पार्टीच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातवरण निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2010 08:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close