S M L

फिफा 2010ची धूम सुरू

11 जूनजगाचे लक्ष लागलेल्या फिफा वर्ल्ड कप 2010चे उद् घाटन जोहान्सबर्ग येथे धूमधडाक्यात झाले. या उद्घाटन सोहळ्याल्या सुमारे 30 हजार लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या शकिरा, जॉन लिंजड, ऍलिशिया के आणि ब्लॅक आईड पीस यांच्या शो प्रेक्षकांनी जल्लोषात एन्जॉय केला. शकीराने उद्घाटनात वेगळीच रंगत भरली.यजमान दक्षिण आफ्रिका आता फुटबॉलमय झाली आहे. या निमित्ताने केप टाऊन आणि जोहान्सबर्गमध्ये हजारो लोक वर्ल्ड कपच्या परेडसाठी रस्त्यावर उतरली होती. जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेची फुटबॉल टीमही या परेडमध्ये होती. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका या स्पर्धेचे आयोजन करत असल्याने इथे कार्निवलच सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध वाद्यांनी जल्लोष केला. सोहळ्यात शकिरा, द ब्लॅक आईड पीस, ऍलिशिया किज, नान अणि ऍन्जेलिक किजो अशा बड्या आंतरराष्ट्रीय आर्टीस्टनी आपली कला सादर केली. फुटबॉल जगतातील माजी दिग्गज खेळाडूंनीही या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या स्पर्धेतील पहिली मॅच असणार आहे ती दक्षिण आफ्रिका आणि मॅक्सिको यांच्यात. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता ही मॅच रंगणार आहे. जवळपास 90 हजार लोक या मॅचला हजेरी लावणार आहेत. तर स्पर्धेत आज दुसरी मॅच रंगणार आहे ती फ्रान्स आणि उरूग्वे यांच्यात. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. दोन्ही टीम्सनी एकेकदा वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 08:50 AM IST

फिफा 2010ची धूम सुरू

11 जून

जगाचे लक्ष लागलेल्या फिफा वर्ल्ड कप 2010चे उद् घाटन जोहान्सबर्ग येथे धूमधडाक्यात झाले. या उद्घाटन सोहळ्याल्या सुमारे 30 हजार लोकांनी हजेरी लावली होती.

यावेळी झालेल्या शकिरा, जॉन लिंजड, ऍलिशिया के आणि ब्लॅक आईड पीस यांच्या शो प्रेक्षकांनी जल्लोषात एन्जॉय केला. शकीराने उद्घाटनात वेगळीच रंगत भरली.

यजमान दक्षिण आफ्रिका आता फुटबॉलमय झाली आहे. या निमित्ताने केप टाऊन आणि जोहान्सबर्गमध्ये हजारो लोक वर्ल्ड कपच्या परेडसाठी रस्त्यावर उतरली होती. जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेची फुटबॉल टीमही या परेडमध्ये होती.

पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका या स्पर्धेचे आयोजन करत असल्याने इथे कार्निवलच सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध वाद्यांनी जल्लोष केला.

सोहळ्यात शकिरा, द ब्लॅक आईड पीस, ऍलिशिया किज, नान अणि ऍन्जेलिक किजो अशा बड्या आंतरराष्ट्रीय आर्टीस्टनी आपली कला सादर केली. फुटबॉल जगतातील माजी दिग्गज खेळाडूंनीही या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.

या स्पर्धेतील पहिली मॅच असणार आहे ती दक्षिण आफ्रिका आणि मॅक्सिको यांच्यात. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता ही मॅच रंगणार आहे. जवळपास 90 हजार लोक या मॅचला हजेरी लावणार आहेत.

तर स्पर्धेत आज दुसरी मॅच रंगणार आहे ती फ्रान्स आणि उरूग्वे यांच्यात. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. दोन्ही टीम्सनी एकेकदा वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 08:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close