S M L

सेना शोधणार पराभवाची कारणे

11 जूनशिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार अनिल परब यांच्या पराभवामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. परब यांचा पराभव नेमका कशामुळे झाला, याची कारणमिमांसा येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. मातोश्रीवर आज राज्यसभेवर निवडून आलेले खासदार संजय राऊत, तर विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेले दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. त्याशिवाय सुभाष देसाई, नीलम गोर्‍हे आणि दीपक सावंत आदी नेतेही यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत शिवसेना व्होटींग मॅनेजमेंट करण्यात अपयशी ठरली. दिवाकर रावते यांना 27 मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना26 मते पडल्याने ते पहिल्या फेरीत निवडून येऊ शकले नाहीत. ते जर पहिल्या फेरीत निवडून आले असते, तर त्यांच्या दुसर्‍या क्रमांकाच्या मतांचा फायदा अनिल परब यांना होऊ शकला असता. भाजप आणि शिवसेना यांचा एकही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून न आल्याने त्यांच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांचा फायदा युतीच्या उमेदवारांना झाला नाही. याबाबत आजच्या भेटीत जुजबी चर्चा झाली. पराभवाची कारणे शोधण्यासाठी येत्या काही दिवसात एखादी सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 09:30 AM IST

सेना शोधणार पराभवाची कारणे

11 जून

शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार अनिल परब यांच्या पराभवामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. परब यांचा पराभव नेमका कशामुळे झाला, याची कारणमिमांसा येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.

मातोश्रीवर आज राज्यसभेवर निवडून आलेले खासदार संजय राऊत, तर विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेले दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. त्याशिवाय सुभाष देसाई, नीलम गोर्‍हे आणि दीपक सावंत आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.

या निवडणुकीत शिवसेना व्होटींग मॅनेजमेंट करण्यात अपयशी ठरली. दिवाकर रावते यांना 27 मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना26 मते पडल्याने ते पहिल्या फेरीत निवडून येऊ शकले नाहीत. ते जर पहिल्या फेरीत निवडून आले असते, तर त्यांच्या दुसर्‍या क्रमांकाच्या मतांचा फायदा अनिल परब यांना होऊ शकला असता.

भाजप आणि शिवसेना यांचा एकही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून न आल्याने त्यांच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांचा फायदा युतीच्या उमेदवारांना झाला नाही. याबाबत आजच्या भेटीत जुजबी चर्चा झाली. पराभवाची कारणे शोधण्यासाठी येत्या काही दिवसात एखादी सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close