S M L

राष्ट्रपती उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर

11 जूनराष्ट्रपती प्रतिभा पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज बोदवड उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन केले. तापी नदीतून लाखो लिटर पाणी वाहून जाते. वाया जाणार्‍या या पाण्याचा उपयोग या प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांतील 42 हजार हेक्टर कोरडवाहू शेतजमिनीला होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. गेल्या 21 वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेला आता कुठे चालना मिळाली आहे. जळगाव हे प्रतिभाताई पाटील यांचे माहेर असल्याने तब्बल 21 वर्षाने का होईना, या योजनेला सुरुवात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 12:01 PM IST

राष्ट्रपती उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर

11 जून

राष्ट्रपती प्रतिभा पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज बोदवड उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन केले.

तापी नदीतून लाखो लिटर पाणी वाहून जाते. वाया जाणार्‍या या पाण्याचा उपयोग या प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांतील 42 हजार हेक्टर कोरडवाहू शेतजमिनीला होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांना मुबलक पाणी मिळणार आहे.

गेल्या 21 वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेला आता कुठे चालना मिळाली आहे.

जळगाव हे प्रतिभाताई पाटील यांचे माहेर असल्याने तब्बल 21 वर्षाने का होईना, या योजनेला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close