S M L

मुंबईत पाणीकपात कायम

11 जूनमान्सून दाखल झाला असला तरीही मुंबईकरांना पाणीकपात सहन करावी लागणार आहे. येत्या 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणी कपात कायम राहील, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईत पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत 30 ते 50 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पण 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. सध्या धरणांमध्ये 80 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. हा साठा मुंबईला जुलैपर्यंत पुरणार आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत किती पाऊस झाला त्यावर एक नजर टाकूया....अप्परवैतरणा- 64 मिमीतानसा- 38 मिमीविहार- 59 मिमीमोडकसागर- 42 मिमीतुलसी-37 मिमीभातसा- 65 मिमी

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 02:42 PM IST

मुंबईत पाणीकपात कायम

11 जून

मान्सून दाखल झाला असला तरीही मुंबईकरांना पाणीकपात सहन करावी लागणार आहे. येत्या 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणी कपात कायम राहील, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत 30 ते 50 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पण 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. सध्या धरणांमध्ये 80 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. हा साठा मुंबईला जुलैपर्यंत पुरणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत किती पाऊस झाला त्यावर एक नजर टाकूया....

अप्परवैतरणा- 64 मिमी

तानसा- 38 मिमी

विहार- 59 मिमी

मोडकसागर- 42 मिमी

तुलसी-37 मिमी

भातसा- 65 मिमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close