S M L

'राज ठाकरे हे काँग्रेस पुरस्कृत...'

12 जूनशिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकच प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात ते म्हणतात, ''स्वत: शेण खायचे आणि दुसर्‍याच्या तोंडाचा वास घ्यायचा, हाच राज ठाकरेंचा उद्योग आहे. विधान परिषद निवडणुकीत ते उघडले पडले आहेत. राज ठाकरे हे काँग्रेस पुरस्कृत आहेत. अबू आझमीला मारल्याचे नाटक करून आता राज ठाकरे अबू आझमींच्याच कळपात सामील झाले आहेत.'' मराठी माणसाशी गद्दारी करून राज ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.'मनसे ही धनसे' असल्याची टीका 'सामना'तून करण्यात आली होती. त्यानंतर आजही 'सामना'तून पुन्हा टीका झाल्याने राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर थेट हल्ला केला होता. ''होय, मी काँग्रेस आघाडीला मतदान केले. कारण मला माझ्या आमदारांचे निलंबन मागे घ्यायचे होते. मी कोणालाही बांधील नाही. आणि शिवसेनेच्या सूचनेवर मी माझा पक्ष चालवत नाही'', असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता उद्धव यांनी पुन्हा हा हल्ला चढवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 04:12 PM IST

'राज ठाकरे हे काँग्रेस पुरस्कृत...'

12 जून

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकच प्रसिद्ध केले आहे.

या पत्रकात ते म्हणतात, ''स्वत: शेण खायचे आणि दुसर्‍याच्या तोंडाचा वास घ्यायचा, हाच राज ठाकरेंचा उद्योग आहे. विधान परिषद निवडणुकीत ते उघडले पडले आहेत. राज ठाकरे हे काँग्रेस पुरस्कृत आहेत. अबू आझमीला मारल्याचे नाटक करून आता राज ठाकरे अबू आझमींच्याच कळपात सामील झाले आहेत.''

मराठी माणसाशी गद्दारी करून राज ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

'मनसे ही धनसे' असल्याची टीका 'सामना'तून करण्यात आली होती. त्यानंतर आजही 'सामना'तून पुन्हा टीका झाल्याने राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर थेट हल्ला केला होता.

''होय, मी काँग्रेस आघाडीला मतदान केले. कारण मला माझ्या आमदारांचे निलंबन मागे घ्यायचे होते. मी कोणालाही बांधील नाही. आणि शिवसेनेच्या सूचनेवर मी माझा पक्ष चालवत नाही'', असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता उद्धव यांनी पुन्हा हा हल्ला चढवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close