S M L

न्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या वकिलाला 2 महिन्याची शिक्षा

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2017 07:36 PM IST

न्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या वकिलाला 2 महिन्याची शिक्षा

28 फेब्रुवारी : न्यायाधीशांवर आरोप करणं आणि न्यायालयाचा अवमान करण्या प्रकरणी अॅड.सतीश उके यांना दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने असा आदेश दिलाय. तर दोन हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप अॅडव्होकेट उके यांनी केला होता. ते आरोप कोर्टाने फेटाळले. त्यामुळे उके यांनी कोर्टावर मुख्यमंत्र्यांना क्लिन चिट दिल्याचे आरोप केले. तसंच न्यायमूर्तींचे कुटुंब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोपही उके यांनी केला होता. त्यामुळे विविध न्यायमूर्तींवर आरोप केल्याने अवमान प्रकरणात अॅड उके यांच्यावर कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close