S M L

मुंबई, पुण्यात मुसळधार

14 जूनअखेर मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहर आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस पडत होता. पण आता पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर, हिंदमाता या दरवर्षी पाणी भरणार्‍या भागांमध्ये या थोड्या पावसानेही लगचेच पाणी भरले आहे.पुण्यात मुसळधारपुण्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी अडीच तासात 62.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले. शिवाय या पावसामुळे वाहतूकही विस्कळित झाली. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढेल, असे वेधशाळेने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 01:58 PM IST

मुंबई, पुण्यात मुसळधार

14 जून

अखेर मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहर आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस पडत होता. पण आता पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर, हिंदमाता या दरवर्षी पाणी भरणार्‍या भागांमध्ये या थोड्या पावसानेही लगचेच पाणी भरले आहे.

पुण्यात मुसळधार

पुण्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी अडीच तासात 62.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले.

शिवाय या पावसामुळे वाहतूकही विस्कळित झाली. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढेल, असे वेधशाळेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close