S M L

'खट्टा-मिठा'त मराठी तडका

विनोद घाटगे, मुंबई14 जूनमराठी स्टार्सची बॉलिवूडमध्ये कमी नाही. पण सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा क्वचितच मराठी असतात. हिंदी सिनेमात आतापर्यंत दुय्यम दिसणारी ही मराठी भूमिका आता लिड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे, ती अक्षय कुमारच्या खट्टा-मिठा या सिनेमात.लवकरच रिलीज होणार्‍या या सिनेमात अक्षय मराठी युवकाची मध्यवर्ती भूमिका साकारतोय. यानिमित्ताने बॉलिवूडमधील मराठी व्यक्तीरेखांवर एक नजर टाकूया...- रामगोपाल वर्माच्या सरकारमध्ये अमिताभने साकारला सुभाष नागरे...- गॉडफादरचा हिंदी अवतार बनवताना रामूला मराठी व्यक्तिरेखेचा आणि मराठी वातावरणाचा आधार घ्यावासा वाटला...- हेराफेरी मधील बाबुराव आपटे परेश रावलने इतका झक्कास रंगवला, की आज 'बाबुराव' ही भूमिका परेश रावलची ओळख बनली आहे...- कमिनेमधील प्रियांकालाही आपण विसरू शकत नाही. तिने साकारलेली स्वीटी शेखर भोपे अगदी टिपीकल मराठमोळी दिसली...- आणि आता आपल्या समोर येतोय मि. खिलाडी.... सचिन तिचकुळे या मराठमोळ्या तरुणाच्या भूमिकेत. ऍक्शनस्टार अक्षय कुमारचा हा मराठी अवतार लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे... खट्टा मिठा या त्यानेच प्रोड्यूस केलेल्या सिनेमात अक्षय ही भूमिका साकारत आहे. एकंदर मराठीचा बॉलिवूडमधील भाव चांगलाच वधारू लागला आहे, असे म्हणता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 03:18 PM IST

'खट्टा-मिठा'त मराठी तडका

विनोद घाटगे, मुंबई

14 जून

मराठी स्टार्सची बॉलिवूडमध्ये कमी नाही. पण सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा क्वचितच मराठी असतात. हिंदी सिनेमात आतापर्यंत दुय्यम दिसणारी ही मराठी भूमिका आता लिड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे, ती अक्षय कुमारच्या खट्टा-मिठा या सिनेमात.

लवकरच रिलीज होणार्‍या या सिनेमात अक्षय मराठी युवकाची मध्यवर्ती भूमिका साकारतोय. यानिमित्ताने बॉलिवूडमधील मराठी व्यक्तीरेखांवर एक नजर टाकूया...

- रामगोपाल वर्माच्या सरकारमध्ये अमिताभने साकारला सुभाष नागरे...

- गॉडफादरचा हिंदी अवतार बनवताना रामूला मराठी व्यक्तिरेखेचा आणि मराठी वातावरणाचा आधार घ्यावासा वाटला...

- हेराफेरी मधील बाबुराव आपटे परेश रावलने इतका झक्कास रंगवला, की आज 'बाबुराव' ही भूमिका परेश रावलची ओळख बनली आहे...

- कमिनेमधील प्रियांकालाही आपण विसरू शकत नाही. तिने साकारलेली स्वीटी शेखर भोपे अगदी टिपीकल मराठमोळी दिसली...

- आणि आता आपल्या समोर येतोय मि. खिलाडी.... सचिन तिचकुळे या मराठमोळ्या तरुणाच्या भूमिकेत. ऍक्शनस्टार अक्षय कुमारचा हा मराठी अवतार लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे... खट्टा मिठा या त्यानेच प्रोड्यूस केलेल्या सिनेमात अक्षय ही भूमिका साकारत आहे.

एकंदर मराठीचा बॉलिवूडमधील भाव चांगलाच वधारू लागला आहे, असे म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close