S M L

अशीही 'परीक्षा'अन् 'लक्ष्मी'ची पावलं

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2017 10:40 PM IST

अशीही 'परीक्षा'अन् 'लक्ष्मी'ची पावलं

laxmi4402 मार्च : 'इच्छा तेथे मार्ग' कशाला म्हणता हे सोलापूरच्या लक्ष्मी शिंदे या विद्यार्थिनीने दाखवून दिलंय. दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदेने बारावीची परीक्षा चक्क पायाने लिहून सर्वांना आश्चर्यचकित केलंय.

मंगळवारपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली. सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जन्मत:च दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मीने इंग्रजीचा पेपर पायात लेखणी धरून पूर्ण केला. तिच्या या जिद्दीकडे पाहून सबंध वर्गातील परीक्षार्थींसह पर्यवेक्षकही अवाक् झाले. हैदराबाद रोड, विडी घरकूल येथील गोंधळी वस्तीत दहा बाय बाराच्या पत्राशेडमध्ये राहणारी लक्ष्मी ही एका रिक्षाचालकाची मुलगी आहे.

शारीरक व्यंग ही आपली मर्यादा न समजता लक्ष्मीने मोठ्या जिद्दीने आपलं शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि बोर्डाची परिक्षेचा पेपर पायाने लिहिला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत जाण्याची तिला इच्छा आहे. व्यंगावर मात करीत लक्ष्मीने दाखवलेली ही जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे.

ज्ञान ग्रहण करण्यासाठी चालविलेली तपस्या फळास आल्याशिवाय राहणार नाही. समाजातील लक्ष्मीसारख्या हजारो भगिनींना तिची ही जिद्द प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या जिद्दीला IBN लोकमतचा सलाम...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close