S M L

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचाही उमेदवार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 3, 2017 04:40 PM IST

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचाही उमेदवार

03 मार्च : मुंबईत काँग्रेस शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे.

यासाठी राष्ट्रवादीशी काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येणार नाही तर आमचं संख्याबळ का वाया घालवायचं असा सवाल राष्ट्रवादीनं केला आहे. महापालिकेत काँग्रेसनं उमेदवार दिला तर बहुमतासाठीचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा शिवसेनाला फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसमधले वाद काही संपायचं नाव घेत नाही आहे. महापौर पदासाठी उमेदवार देण्यावरून आता संजय निरुपम विरुद्ध ज्येष्ठ नेते असा वाद आता सुरू झाला आहे. निरुपम यांनी हा निर्णय कोणतीही बैठक न घेता घेतला. महापौरपदासाठी गुप्त मतदान होताना जर काँग्रेसची मतं फुटली, तर त्याची जबबादारी कोण घेणार, असा सवाल ज्येष्ठ नेते घेतायेत. त्यामुळे महापौर निवडायच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकावा, अशी त्यांची मागणी आहे. पण निरुपम त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.

महापौरपदासाठी 114 हा आकडा गाठण्याची गरज नाही, तर महापौर निवडणुकीवेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सभासद संख्येपैकी, सर्वाधिक मतं ज्या उमेदवाराला मिळेल, तो महापौर होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close