S M L

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ.कृष्णा किरवलेंची राहत्या घरी हत्या

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2017 06:49 PM IST

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ.कृष्णा किरवलेंची राहत्या घरी हत्या

dr krushna kirvale03 मार्च : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा आज दुपारी खून झाला आहे. शिवाजी विद्यापीठानजीक असलेल्या त्यांच्या घरात दुपारी चाकुने वार करून त्यांचा खून करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशी पदे त्यांनी भुषवली होती. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते. प्रख्यात पुरोगामी विचारवंत अशी त्यांची ओळख होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, दलित साहित्य यांचा त्यांना गाढा अभ्यास होता.  राजेंद्रनगर परिसरात त्यांचे घर आहे. त्यांच्या बेडरूममध्येच त्यांचा खून झाला. दुपारी हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या खुनामागील कारण समजू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close