S M L

जयंत पाटलांच्या साम्राज्याला हादरे

असिफ मुरसल, अमेय तिरोडकर, मुंबई15 जून मैनुद्दीन बागवान प्रकरणात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील फसत चालले आहेत. त्यांनीच केलेल्या सांगलीतील राजकारणाचे बूमरँग त्यांच्यावरच उलटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.खरे तर, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते बळकट झाल्यासारखे वाटत होते. कारण जिल्ह्याच्या राजकारणातून नेस्तनाबूत झालेले आणि त्यांचे पारंपारिक विरोधक राहिलेले वसंतदादा घराणे. सांगली शहर विधानसभा मतदारसंघातून मंत्री राहिलेल्या वसंतदादांचे नातू मदन पाटील यांचा भाजपच्या संभाजी पवार यांनी पराभव केला होता. तर, मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे यांनी दादा घराण्याचे समर्थक बाळासाहेब होनमोरे यांच्या विरोधात निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात असा भाजपने प्रवेश केला. मिरज दंगलीनंतर मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतरच सेक्युलर मतांचा गडकोसळला होता. आणि या दंगलीचा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय आहे, जयंत पाटील यांच्या मैनुद्दीन बागवान या निष्ठावंत कार्यकर्त्यावर. त्यातूनच मैनुद्दीनच्या मागे मोठी शक्ती असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केला. यामागील मोठे मासे गळाला लागले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे. दंगलीवरून असे राजकीय कलगीतुरे गाजले. यावरून जयंतरावांच्या विरोधात आता छुपी महाआघाडी तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 01:56 PM IST

जयंत पाटलांच्या साम्राज्याला हादरे

असिफ मुरसल, अमेय तिरोडकर, मुंबई

15 जून

मैनुद्दीन बागवान प्रकरणात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील फसत चालले आहेत. त्यांनीच केलेल्या सांगलीतील राजकारणाचे बूमरँग त्यांच्यावरच उलटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

खरे तर, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते बळकट झाल्यासारखे वाटत होते. कारण जिल्ह्याच्या राजकारणातून नेस्तनाबूत झालेले आणि त्यांचे पारंपारिक विरोधक राहिलेले वसंतदादा घराणे.

सांगली शहर विधानसभा मतदारसंघातून मंत्री राहिलेल्या वसंतदादांचे नातू मदन पाटील यांचा भाजपच्या संभाजी पवार यांनी पराभव केला होता. तर, मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे यांनी दादा घराण्याचे समर्थक बाळासाहेब होनमोरे यांच्या विरोधात निवडणूक जिंकली.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात असा भाजपने प्रवेश केला. मिरज दंगलीनंतर मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतरच सेक्युलर मतांचा गडकोसळला होता. आणि या दंगलीचा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय आहे, जयंत पाटील यांच्या मैनुद्दीन बागवान या निष्ठावंत कार्यकर्त्यावर. त्यातूनच मैनुद्दीनच्या मागे मोठी शक्ती असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केला. यामागील मोठे मासे गळाला लागले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

दंगलीवरून असे राजकीय कलगीतुरे गाजले. यावरून जयंतरावांच्या विरोधात आता छुपी महाआघाडी तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close