S M L

सचिनचे स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचे

15 जूनमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधील सगळे रेकॉर्ड जमा आहेत. पण अजून त्याची एक इच्छा अपूर्ण आहे. ती म्हणजे भारतीय टीमने वन डे वर्ल्डकप जिंकण्याची...सचिन सध्या ऑल इंग्लंड क्लबच्या निमंत्रणावरून विम्बल्डन बघण्यासाठी लंडनला आला आहे. पण इथेही त्याच्या मनात वर्ल्डकप स्पर्धेचेच विचार घोळत आहेत. क्रिक इन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सचिनने वर्ल्डकप जिंकण्याचे आपले स्वप्न पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे. वर्ल्डकप जिंकणे ही एक प्रक्रिया आहे. तुम्ही थेट पन्नासाव्या मजल्यावर नाही उडी मारू शकत. तुम्हाला तळ मजल्यावरूनच सुरुवात करायला हवी. पण तळमजल्यापासून वरचा प्रवास हा एक न विसरण्यासारखा अनुभव असेल. वर्ल्डकप जिंकणं हे माझ्या एकट्याचे स्वप्न नाही. तर करोडो भारतीय माझ्याबरोबर हेच स्वप्न बघत आहेत. याची जाणीव मला आहे, असे सचिन म्हणाला. सध्याच्या टीमचे सचिनने कौतुक केले आहे. आताची टीम बघितली तर वर्ल्डकप फायनल गाठणे मला कठीण वाटत नाही. फक्त सगळ्यांनी गुणवत्तेनुसार खेळ करायला हवा, असे सचिनला वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 02:08 PM IST

सचिनचे स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचे

15 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधील सगळे रेकॉर्ड जमा आहेत. पण अजून त्याची एक इच्छा अपूर्ण आहे. ती म्हणजे भारतीय टीमने वन डे वर्ल्डकप जिंकण्याची...

सचिन सध्या ऑल इंग्लंड क्लबच्या निमंत्रणावरून विम्बल्डन बघण्यासाठी लंडनला आला आहे. पण इथेही त्याच्या मनात वर्ल्डकप स्पर्धेचेच विचार घोळत आहेत. क्रिक इन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सचिनने वर्ल्डकप जिंकण्याचे आपले स्वप्न पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे.

वर्ल्डकप जिंकणे ही एक प्रक्रिया आहे. तुम्ही थेट पन्नासाव्या मजल्यावर नाही उडी मारू शकत. तुम्हाला तळ मजल्यावरूनच सुरुवात करायला हवी. पण तळमजल्यापासून वरचा प्रवास हा एक न विसरण्यासारखा अनुभव असेल. वर्ल्डकप जिंकणं हे माझ्या एकट्याचे स्वप्न नाही. तर करोडो भारतीय माझ्याबरोबर हेच स्वप्न बघत आहेत. याची जाणीव मला आहे, असे सचिन म्हणाला.

सध्याच्या टीमचे सचिनने कौतुक केले आहे. आताची टीम बघितली तर वर्ल्डकप फायनल गाठणे मला कठीण वाटत नाही. फक्त सगळ्यांनी गुणवत्तेनुसार खेळ करायला हवा, असे सचिनला वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close