S M L

ठाण्यातील राष्ट्रवादीला संधीवात

मिलिंद तांबे, विनय म्हात्रे, ठाणे 15 जूनठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या संधीवात झाला आहे. जिल्ह्यात एकूण आमदार 24. पण त्यातील राष्ट्रवादीचे आमदार फक्त 5 ...काही वर्षांपूर्वी बलाढ्य वाटणारी राष्ट्रवादी आता मात्र अंतर्गत संघर्षात कमजोर होत चालली आहे.सध्या राष्ट्रवादीला अंतर्गत वादाने पछाडले आहे. त्याचा अनुभव पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले वसंत डावखरेंनाही आला.विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांनाही झगडावे लागले. यावरूनच कळते की, नेत्यांमध्ये कशी स्पर्धा सुरू आहे.नाईक विरूद्ध डावखरे विरूद्ध आव्हाड असा राष्ट्रवादीतील हा तिरंगी सामना आहे. ठाणे राष्ट्रवादीच्या हातात येत नाही, याचे हे एकमेव कारण आहे, असे म्हणतात. डावखरेंना उमेदवारी मिळू नये म्हणून गणेश नाईक झगडले. गणपत गायकवाड या डावखरे समर्थक अपक्ष आमदाराने विधान परिषद निवडणुकीत गणेश नाईकांचे नेतृत्व आपण मानत नाही, असे राज्य नेतृत्वाला ठणकावले.अंबरनाथ बदलापूर निवडणुकीत डावखरे समर्थक किसन कथोरे यांनी सेना भाजपसोबत आघाडी केली.ठाणे ग्रामीण राष्ट्रवादीविरोधात डावखरे सातत्याने हितेंद्र ठाकूरच्या सोबत उभे राहिले. गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांच्यात मात्र अजूनही दिलजमाई होताना दिसत नाही.एकीकडे असा आशावाद आहे, तर नाराजांची फौजही तितकीच मोठी आहे. गणपत गायकवाड, मंदा म्हात्रे, प्रमोद हिंदुराव, कपिल पाटील अशी नाराजांची फळीही तशीच उभी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 02:21 PM IST

ठाण्यातील राष्ट्रवादीला संधीवात

मिलिंद तांबे, विनय म्हात्रे, ठाणे

15 जून

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या संधीवात झाला आहे. जिल्ह्यात एकूण आमदार 24. पण त्यातील राष्ट्रवादीचे आमदार फक्त 5 ...काही वर्षांपूर्वी बलाढ्य वाटणारी राष्ट्रवादी आता मात्र अंतर्गत संघर्षात कमजोर होत चालली आहे.

सध्या राष्ट्रवादीला अंतर्गत वादाने पछाडले आहे. त्याचा अनुभव पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले वसंत डावखरेंनाही आला.विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांनाही झगडावे लागले. यावरूनच कळते की, नेत्यांमध्ये कशी स्पर्धा सुरू आहे.

नाईक विरूद्ध डावखरे विरूद्ध आव्हाड असा राष्ट्रवादीतील हा तिरंगी सामना आहे. ठाणे राष्ट्रवादीच्या हातात येत नाही, याचे हे एकमेव कारण आहे, असे म्हणतात.

डावखरेंना उमेदवारी मिळू नये म्हणून गणेश नाईक झगडले. गणपत गायकवाड या डावखरे समर्थक अपक्ष आमदाराने विधान परिषद निवडणुकीत गणेश नाईकांचे नेतृत्व आपण मानत नाही, असे राज्य नेतृत्वाला ठणकावले.

अंबरनाथ बदलापूर निवडणुकीत डावखरे समर्थक किसन कथोरे यांनी सेना भाजपसोबत आघाडी केली.ठाणे ग्रामीण राष्ट्रवादीविरोधात डावखरे सातत्याने हितेंद्र ठाकूरच्या सोबत उभे राहिले. गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांच्यात मात्र अजूनही दिलजमाई होताना दिसत नाही.

एकीकडे असा आशावाद आहे, तर नाराजांची फौजही तितकीच मोठी आहे. गणपत गायकवाड, मंदा म्हात्रे, प्रमोद हिंदुराव, कपिल पाटील अशी नाराजांची फळीही तशीच उभी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close