S M L

रिक्षांचे सिमोल्लंघन...

16 जूनमुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ऑटो रिक्षाने प्रवास करणार्‍यांसाठी आता एक खूषखबर आहे. आता या विभागातील रिक्षांना महापालिकेच्या हद्दींचे निर्बंध लागणार नाहीत. यापूर्वी एका महापालिका विभागातील रिक्षा दुसर्‍या महापालिका विभागात जात नव्हत्या. पण आता संपूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरे या भागांत रिक्षांचा प्रवास विना अडथळा होऊ शकतो. मुंबई शहरात मात्र रिक्षांना परवानगी नाहीच. पण इतर भागातील निर्बंध हटल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सात महापालिका, दोन नगरपालिकांच्या भागांमध्ये मुंबई उपनगरांतील रिक्षाही जाऊ शकतात. शिवाय रायगडमधील सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रातही या रिक्षा जाऊ शकतात. शिवाय, ठाणे आणि रायगडमधल्या रिक्षाही मुंबई उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करू शकतात. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2010 10:03 AM IST

रिक्षांचे सिमोल्लंघन...

16 जून

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ऑटो रिक्षाने प्रवास करणार्‍यांसाठी आता एक खूषखबर आहे. आता या विभागातील रिक्षांना महापालिकेच्या हद्दींचे निर्बंध लागणार नाहीत. यापूर्वी एका महापालिका विभागातील रिक्षा दुसर्‍या महापालिका विभागात जात नव्हत्या.

पण आता संपूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरे या भागांत रिक्षांचा प्रवास विना अडथळा होऊ शकतो. मुंबई शहरात मात्र रिक्षांना परवानगी नाहीच.

पण इतर भागातील निर्बंध हटल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सात महापालिका, दोन नगरपालिकांच्या भागांमध्ये मुंबई उपनगरांतील रिक्षाही जाऊ शकतात. शिवाय रायगडमधील सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रातही या रिक्षा जाऊ शकतात.

शिवाय, ठाणे आणि रायगडमधल्या रिक्षाही मुंबई उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करू शकतात. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2010 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close