S M L

म्हैसाळ गर्भपात रॅकेट प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन, तिघांना अटक

Sachin Salve | Updated On: Mar 8, 2017 09:32 PM IST

म्हैसाळ गर्भपात रॅकेट प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन, तिघांना अटक

08 मार्च : म्हैसाळच्या गर्भपात रॅकेट प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक करण्यात आली आङे. या तिघांमध्ये कर्नाटकातील कागवाड गावातील डॉक्टर श्रीहरी घोडके याचा समावेश आहे.

शिवाय खिद्रापुरेची नर्स कांचन रोझे आणि कंपाऊंडर उमेश साळुंखे यालाही अटक करण्यात आलीये. अटक केलेल्या तिघांना आज मिरज कोर्टात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हैसाळला भेट दिली. यावेळी त्यांनी खिद्रापुरेनं भ्रूण पुरलेल्या ठिकाणाची पाहणी केली. गर्भपात रॅकेटशी संबंध असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 09:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close