S M L

टि्वटरवर #शेतकरी_कर्जमाफी साठी एल्गार

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2017 11:54 PM IST

टि्वटरवर #शेतकरी_कर्जमाफी साठी एल्गार

09 मार्च : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी अधिवेशनात विरोधकांनी मागणी लावून धरलीये. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुलांनी टिवटरवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा एल्गार पुकारलाय. यासाठी #शेतकरी_कर्जमाफी हा हॅशटॅग वापरला जात आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत  #शेतकरी_कर्जमाफी ही मोहीम राबवण्यात येत आहे. तसंच यासाठी फेसबुक लाईव्हचा वापरही करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

स्वतःचा, कुटुंबियांचा किंवा मित्रांचा व्हिडिओ पोस्ट करून  शेतकरी कर्जमाफीसाठी विनंती करावी अशी मागणी आयोजकांनी केलीये.

आयबीएन लोकमतही या मोहिमेला प्रोत्साहन देत असून #शेतकरी _कर्जमाफी टॅग वापरावा असं आवाहन करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close