S M L

रावणमध्ये ऐश्वर्याची स्टंटबाजी...

17 जूनरावण सिनेमा रिलीज होत आहे... त्यातील लोकेशन्स, गाणी, अभिनय सर्वच लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमात ऐश्वर्या रागिणीच्या भूमिकेत आहे. त्यात ती फक्त सुंदर दिसलेली नाही, तर तिने स्टंटही केले आहेत. रावण सिनेमाचे प्रोमोज् बघून सगळ्यांना सिनेमा बघण्याची उत्सुकता लागली आहे. अभिषेकपेक्षा ऐश्वर्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे, ते खुद्द बिग बी ने...अर्थात यातील अदाकारी साकारण्यासाठी ऐश्वर्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे.रावण या सिनेमात रागिणी हे सगळ्यात महत्त्वाचे कॅरॅक्टर आहे. ही रागिणी म्हणजे देव आणि बिरा या दोघांमधील एक मजबूत दुवा आहे.या सिनेमाच्या शूटींग दरम्यान तिला अनेकदा दुखापतीही झाल्या. सिनेमातील अनेक जीवघेणे स्टंटस् तिने मोठ्या बहादुरीने केले. त्यात उंच कड्यावरून उतरणे असो किंवा उड्या मारणे... तिने हे सगळे अभिषेक आणि विक्रमच्या बरोबरीने केले.हा सिनेमा ऐश्वर्यासाठी एक चॅलेंज होते. कसदार अभिनयासोबत शारिरिक आणि मानसिक मेहनतीचीही गरज संपूर्ण सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यान तिला करावी लागली. आता प्रेक्षक रावणला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 03:51 PM IST

रावणमध्ये ऐश्वर्याची स्टंटबाजी...

17 जून

रावण सिनेमा रिलीज होत आहे... त्यातील लोकेशन्स, गाणी, अभिनय सर्वच लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमात ऐश्वर्या रागिणीच्या भूमिकेत आहे. त्यात ती फक्त सुंदर दिसलेली नाही, तर तिने स्टंटही केले आहेत.

रावण सिनेमाचे प्रोमोज् बघून सगळ्यांना सिनेमा बघण्याची उत्सुकता लागली आहे. अभिषेकपेक्षा ऐश्वर्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे, ते खुद्द बिग बी ने...अर्थात यातील अदाकारी साकारण्यासाठी ऐश्वर्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे.

रावण या सिनेमात रागिणी हे सगळ्यात महत्त्वाचे कॅरॅक्टर आहे. ही रागिणी म्हणजे देव आणि बिरा या दोघांमधील एक मजबूत दुवा आहे.

या सिनेमाच्या शूटींग दरम्यान तिला अनेकदा दुखापतीही झाल्या. सिनेमातील अनेक जीवघेणे स्टंटस् तिने मोठ्या बहादुरीने केले. त्यात उंच कड्यावरून उतरणे असो किंवा उड्या मारणे... तिने हे सगळे अभिषेक आणि विक्रमच्या बरोबरीने केले.

हा सिनेमा ऐश्वर्यासाठी एक चॅलेंज होते. कसदार अभिनयासोबत शारिरिक आणि मानसिक मेहनतीचीही गरज संपूर्ण सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यान तिला करावी लागली. आता प्रेक्षक रावणला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close