S M L

जर्मनीला पराभवाचा धक्का

18 जूनफूटबॉल वर्ल्डकपमध्ये लागोपाठ तिसर्‍या दिवशी धक्कादायक निकाल बघायला मिळाला. जर्मनीच्या टीमला पराभवाचा धक्का बसला आहे. सर्बिया टीमने त्यांचा एक - शून्यने पराभव केला. मॅचमध्ये सुरुवातीपासून दोन्ही टीम आक्रमक होत्या. पण त्या नादात जर्मनीच्या दोन खेळाडूंना पहिल्या अर्ध्या तासात दोन यलो कार्ड मिळाली. त्यातच महत्त्वाचा खेळाडू क्लोजला रेड कार्ड मिळाल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. आणि त्याचा फायदा सर्बियन टीमने उचलला. 38व्या मिनिटालाच त्यांच्या योवानोव्हिकने कॉर्नरवर सुरेख गोल केला. आणि सर्बियाने मॅचमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर जर्मनीच्या टीमनेही आक्रमणाचे प्रयत्न केले. सर्बियाची टीमने या हल्ल्यांना दाद दिली नाही. जर्मनीच्या पराभवामुळे डी गटात दुसर्‍या राऊंडची चुरस वाढली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2010 06:09 PM IST

जर्मनीला पराभवाचा धक्का

18 जून

फूटबॉल वर्ल्डकपमध्ये लागोपाठ तिसर्‍या दिवशी धक्कादायक निकाल बघायला मिळाला. जर्मनीच्या टीमला पराभवाचा धक्का बसला आहे.

सर्बिया टीमने त्यांचा एक - शून्यने पराभव केला. मॅचमध्ये सुरुवातीपासून दोन्ही टीम आक्रमक होत्या. पण त्या नादात जर्मनीच्या दोन खेळाडूंना पहिल्या अर्ध्या तासात दोन यलो कार्ड मिळाली.

त्यातच महत्त्वाचा खेळाडू क्लोजला रेड कार्ड मिळाल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. आणि त्याचा फायदा सर्बियन टीमने उचलला. 38व्या मिनिटालाच त्यांच्या योवानोव्हिकने कॉर्नरवर सुरेख गोल केला. आणि सर्बियाने मॅचमध्ये आघाडी घेतली.

त्यानंतर जर्मनीच्या टीमनेही आक्रमणाचे प्रयत्न केले. सर्बियाची टीमने या हल्ल्यांना दाद दिली नाही. जर्मनीच्या पराभवामुळे डी गटात दुसर्‍या राऊंडची चुरस वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2010 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close