S M L

श्रीदेवी पुन्हा एकदा बनतेय 'माॅम'

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2017 01:31 PM IST

श्रीदेवी पुन्हा एकदा बनतेय 'माॅम'

14 मार्च : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमानंतर पाच वर्षांनी पुन्हा एकदा श्रीदेवीचा नवा सिनेमा येतोय 'माॅम'. माॅम सिनेमाचं पहिलं पोस्टर श्रीदेवीनं ट्विटरवर शेअर केलं.त्यावर लिहिलंय, जेव्हा एका महिलेला आव्हान दिलं जातं...' पोस्टरवरून श्रीदेवीची भूमिका दमदार असल्याचं कळतंय.

सिनेमाच्या पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये आई असं लिहिलंय. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्नाही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. सिनेमाची निर्मिती बोनी कपूर करतोय.

'इंग्लिश विंग्लिश'मध्येही श्रीदेवी आईच्या भूमिकेत होती. त्यात तिच्यासमोरचं इंग्लिश शिकण्याचं आव्हान तिनं चांगलंच पेललं. 'माॅम'चं दिग्दर्शन रवी उदयवारचं आहे. सिनेमा तेलगू आणि तामिळमध्येही रिलीज होतय. 14 जुलैला सिनेमा रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close