S M L

पाकिस्तानचे भारतासमोर 268 रन्सचे आव्हान

19 जूनएशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर 268 रन्सचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तान टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत चांगली सुरुवात केली. ओपनर सलमान बट्टने शानदार हाफ सेंच्युरी करत पाक इनिंगला आकार दिला. आणि त्या जोरावर पाक टीमने 25 ओव्हर्समध्ये 125 रन्सचा टप्पाही ओलांडला. भारतीय बॉलर्स आज सुरुवातीला विकेट घेण्यात अपयशी ठरले. अखेर हरभजन सिंगने टीमला पहिली विकेट मिळवून दिली ती सोळाव्या ओव्हरमध्ये. इमरान फरहतला त्याने 25 रन्सवर आऊट केले. त्यानंतर लगेचच शोएब मलिकही 39 रन्सवर आऊट झाला. सेहवागने स्लीपमध्ये सोपा कॅच पकडला. लागोपाठ रवींद्र जडेजानेही एका अप्रतिम थ्रोवर सलमान बट्टला रन आऊट केले. त्यानंतर आलेला उमर अमिन झटपट पॅव्हेलियनमध्ये परतला. हरभजन सिंगच्या बॉलिंगवर विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा एक अप्रतिम कॅच पकडला. त्यानंतर मात्र शाहीद आफ्रिदी आणि कामरान अकमलने चांगली पार्टनरशिप केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 12:35 PM IST

पाकिस्तानचे भारतासमोर 268 रन्सचे आव्हान

19 जून

एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर 268 रन्सचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तान टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत चांगली सुरुवात केली.

ओपनर सलमान बट्टने शानदार हाफ सेंच्युरी करत पाक इनिंगला आकार दिला. आणि त्या जोरावर पाक टीमने 25 ओव्हर्समध्ये 125 रन्सचा टप्पाही ओलांडला. भारतीय बॉलर्स आज सुरुवातीला विकेट घेण्यात अपयशी ठरले.

अखेर हरभजन सिंगने टीमला पहिली विकेट मिळवून दिली ती सोळाव्या ओव्हरमध्ये. इमरान फरहतला त्याने 25 रन्सवर आऊट केले. त्यानंतर लगेचच शोएब मलिकही 39 रन्सवर आऊट झाला.

सेहवागने स्लीपमध्ये सोपा कॅच पकडला. लागोपाठ रवींद्र जडेजानेही एका अप्रतिम थ्रोवर सलमान बट्टला रन आऊट केले. त्यानंतर आलेला उमर अमिन झटपट पॅव्हेलियनमध्ये परतला.

हरभजन सिंगच्या बॉलिंगवर विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा एक अप्रतिम कॅच पकडला. त्यानंतर मात्र शाहीद आफ्रिदी आणि कामरान अकमलने चांगली पार्टनरशिप केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close