S M L

दलित महिला सरपंच होण्यास विरोध

पुरूषोत्तम भांगे, लातूर19 जूनदलित महिला महिला सरपंच होणार, हे पाहून सवर्णांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातील गोताळा गावात घडला आहे. या गावचे सरपंचपद दलित महिलेसाठी आरक्षित झाले आहे. 10 वर्षांपूर्वी याच गावात तीन दलित तरूणांची भर दिवसा हत्या करण्यात आली होती. गोताळ्यातील 200 घरांपैकी 40 घरे दलितांची आहेत. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच दलित महिला उमेदवारासाठी आरक्षित झाले. गावाचा कारभार दलित महिलेच्या हातात जाणे मान्य नसल्यामुळे कोणीही उमेदवारी अर्ज करायचा नाही असा फतवा गावकर्‍यांनी काढला आहे. गावातील दलित वस्तीत सध्या दहशतीचे वातावरण आहे. या दलित वस्तीत आजही लाईट , पिण्याचे पाणी अशा मुलभूत सोयीसुविधा नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 12:58 PM IST

दलित महिला सरपंच होण्यास विरोध

पुरूषोत्तम भांगे, लातूर

19 जून

दलित महिला महिला सरपंच होणार, हे पाहून सवर्णांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातील गोताळा गावात घडला आहे.

या गावचे सरपंचपद दलित महिलेसाठी आरक्षित झाले आहे. 10 वर्षांपूर्वी याच गावात तीन दलित तरूणांची भर दिवसा हत्या करण्यात आली होती. गोताळ्यातील 200 घरांपैकी 40 घरे दलितांची आहेत.

या ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच दलित महिला उमेदवारासाठी आरक्षित झाले. गावाचा कारभार दलित महिलेच्या हातात जाणे मान्य नसल्यामुळे कोणीही उमेदवारी अर्ज करायचा नाही असा फतवा गावकर्‍यांनी काढला आहे.

गावातील दलित वस्तीत सध्या दहशतीचे वातावरण आहे. या दलित वस्तीत आजही लाईट , पिण्याचे पाणी अशा मुलभूत सोयीसुविधा नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close