S M L

बाळेही झाली फूटबॉलमय...

रॉबिन करनाव, दक्षिण आफ्रिका19 जूनदक्षिण आफ्रिका पूर्णत: फूटबॉल वेडी झाली आहे. आणि तुम्हाला त्याची खात्री पटेल नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांकडे बघून. गेल्या आठवड्याभरात दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मुलांची नावे फूटबॉलशी संबंधित ठेवण्यात आली आहेत. के नाको म्हणजे इट्स हिअर ते बफाना बफाना अशी या मुलांची नावे आहेत.वर्ल्ड कपमधील पहिली मॅच सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी सॉकर स्टेडियमपासून जवळच्या गल्लीतील घरात एक बाळ जन्माला आले. बाळाच्या आईने त्याचे नाव 'फिफा' ठेवले. यानंतर नवजात बाळांची नावे फूटबॉलशी संबंधित ठेवण्याची स्पर्धाच सुरू झाली. खरे तर दक्षिण आफ्रिकन लोकांना फूटबॉल मनापासून आवडतो. येथील मुले चालायला शिकतात, त्याच वेळी फूटबॉलही खेळायला लागतात. दक्षिण आफ्रिकेत एकूणच मुलांची नाव ठेवण्याची अनोखी रित आहे. त्या त्या वेळची जशी राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती असेल तशी नावे ते आपल्या मुलांना देतात. बफाना बफाना ही येथील नॅशनल टीम आहे. आणि टीममधल्या काही खेळाडूंची नावे आहेत, मॅकबेथ, किलर आणि सरप्राईज...अशीच फूटबॉलशी संबंधित नावे जन्माला येणार्‍या प्रत्येक बाळाला मिळत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 01:10 PM IST

बाळेही झाली फूटबॉलमय...

रॉबिन करनाव, दक्षिण आफ्रिका

19 जून

दक्षिण आफ्रिका पूर्णत: फूटबॉल वेडी झाली आहे. आणि तुम्हाला त्याची खात्री पटेल नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांकडे बघून. गेल्या आठवड्याभरात दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मुलांची नावे फूटबॉलशी संबंधित ठेवण्यात आली आहेत. के नाको म्हणजे इट्स हिअर ते बफाना बफाना अशी या मुलांची नावे आहेत.

वर्ल्ड कपमधील पहिली मॅच सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी सॉकर स्टेडियमपासून जवळच्या गल्लीतील घरात एक बाळ जन्माला आले. बाळाच्या आईने त्याचे नाव 'फिफा' ठेवले.

यानंतर नवजात बाळांची नावे फूटबॉलशी संबंधित ठेवण्याची स्पर्धाच सुरू झाली.

खरे तर दक्षिण आफ्रिकन लोकांना फूटबॉल मनापासून आवडतो. येथील मुले चालायला शिकतात, त्याच वेळी फूटबॉलही खेळायला लागतात.

दक्षिण आफ्रिकेत एकूणच मुलांची नाव ठेवण्याची अनोखी रित आहे. त्या त्या वेळची जशी राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती असेल तशी नावे ते आपल्या मुलांना देतात. बफाना बफाना ही येथील नॅशनल टीम आहे. आणि टीममधल्या काही खेळाडूंची नावे आहेत, मॅकबेथ, किलर आणि सरप्राईज...

अशीच फूटबॉलशी संबंधित नावे जन्माला येणार्‍या प्रत्येक बाळाला मिळत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close