S M L

बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला

19 जूनकुर्ला नेहरूनगरमधून बेपत्ता असलेल्या नुसरत शेख या मुलीचा अखेर मृतदेह सापडला आहे. याच भागातील एका बंद खोलीत हा मृतदेह सापडला. हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना हा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून ही खोली बंद होती. खोलीतून वास येऊ लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. या खोलीत राहणारी व्यक्ती अनेक दिवसांपासून इकडे फिरकली नसल्याचे आजूबाजूचे लोक सांगत आहेत. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे बेपत्ता अल्पवयीन मुलींचे मृतदेह सापडण्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. पण अजूनही गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड संतापले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 02:14 PM IST

बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला

19 जून

कुर्ला नेहरूनगरमधून बेपत्ता असलेल्या नुसरत शेख या मुलीचा अखेर मृतदेह सापडला आहे. याच भागातील एका बंद खोलीत हा मृतदेह सापडला. हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना हा मृतदेह आढळला.

गेल्या काही दिवसांपासून ही खोली बंद होती. खोलीतून वास येऊ लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. या खोलीत राहणारी व्यक्ती अनेक दिवसांपासून इकडे फिरकली नसल्याचे आजूबाजूचे लोक सांगत आहेत.

मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे बेपत्ता अल्पवयीन मुलींचे मृतदेह सापडण्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.

पण अजूनही गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड संतापले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close