S M L

पुरस्कारांची दिवाळी, सुविधांचा शिमगा...

शमीम आतार, वाणेवाडी, बारामती19 जून बारामती म्हणजे विकासात अग्रेसर असलेला तालुका असा दावा नेहमीच केला जातो...जलसंपदा मंत्री अजित पवारांचा हा मतदारसंघ...परंतु त्यांच्याच तालुक्यातील वाणेवाडी या गावात कोणत्याही मुलभूत सेवा सुविधा नाहीत. तरीही या गावाला सरकारने निर्मल ग्राम आणि आदर्श ग्राम पुरस्कारांनी गौरवले आहे. एकीकडे गावाला पुरस्कार मिळत आहेत, तर दुसरीकडे गावकरी मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडत आहेत, असे चित्र या गावात पाहायला मिळते. पुरस्कार मिरवणार्‍या ग्रामपंचायतीने लोकांना पाणीही दिलेले नाही. निर्मलग्राम असलेल्या वाणेवाडीत शौचालयेही नाहीत. गावातील महिलांनी वारंवार मागणी केल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे'च आहे.अशा मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला तरी कसा, हा प्रश्न ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही पडला आहे.आपल्या 60 कुटंुबांच्या वस्तीला दोन पुरस्कारांची खैरात करण्याऐवजी पाणी, वीज आणि रस्ते या मुलभूत सेवासुविधा दिल्या असत्या तर बरे झाले असते, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2010 02:55 PM IST

पुरस्कारांची दिवाळी, सुविधांचा शिमगा...

शमीम आतार, वाणेवाडी, बारामती

19 जून

बारामती म्हणजे विकासात अग्रेसर असलेला तालुका असा दावा नेहमीच केला जातो...जलसंपदा मंत्री अजित पवारांचा हा मतदारसंघ...परंतु त्यांच्याच तालुक्यातील वाणेवाडी या गावात कोणत्याही मुलभूत सेवा सुविधा नाहीत.

तरीही या गावाला सरकारने निर्मल ग्राम आणि आदर्श ग्राम पुरस्कारांनी गौरवले आहे. एकीकडे गावाला पुरस्कार मिळत आहेत, तर दुसरीकडे गावकरी मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडत आहेत, असे चित्र या गावात पाहायला मिळते.

पुरस्कार मिरवणार्‍या ग्रामपंचायतीने लोकांना पाणीही दिलेले नाही.

निर्मलग्राम असलेल्या वाणेवाडीत शौचालयेही नाहीत. गावातील महिलांनी वारंवार मागणी केल्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे'च आहे.अशा मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला तरी कसा, हा प्रश्न ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही पडला आहे.

आपल्या 60 कुटंुबांच्या वस्तीला दोन पुरस्कारांची खैरात करण्याऐवजी पाणी, वीज आणि रस्ते या मुलभूत सेवासुविधा दिल्या असत्या तर बरे झाले असते, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2010 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close