S M L

युतीमधील दरी वाढली

21 जूनऔरंगाबाद महापालिकेतील धुडगुसानंतर शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढतच चालला आहे. अशातच हरिभाऊ बागडे यांच्या घरावरील हल्ल्यानंतर औरंगाबादमध्ये आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला चांगलेच खडसावले आहे. दोन दिवसांत युतीबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. दुसरीकडे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष राजू शिंदे यांनीही राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यावर 'तोडायची असेल, तर युती खुशाल तोडा' असे उत्तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे. यामुळे युतीतील तणावाची दरी वाढत चालली आहे. येत्या दोन दिवसांत ही यादवी आपले खरे रूप दाखवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. खडसेंची पाहणी...विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी औरंगाबादमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयावर शिवसेनेने हल्ला केला होता. तिथेही त्यांनी भेट दिली. त्यावेळी, हा हल्ला बागडे यांच्यावर नाही, तर भाजपवर आहे, असे खडे बोल त्यांनी सुनावले. शिवाय चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. राठोड यांच्या भावावर हल्लाशिवसेना-भाजप नगरसेवकांमधील राड्यानंतर, आता औरंगाबाद महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड यांच्यासह त्यांच्या भावावर अज्ञात लोकांनी रात्री हल्ला केला. शहरातील चिश्तीया चौकामध्ये प्रमोद राठोड यांच्या श्रीयश या संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी काही लोक दगडफेक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रमोद राठोड आणि त्यांचे भाऊ प्रदीप राठोड हे तिथे गेले. त्यावेळी त्यांच्यावर बेल्ट आणि चेनने हल्ला करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2010 09:48 AM IST

युतीमधील दरी वाढली

21 जून

औरंगाबाद महापालिकेतील धुडगुसानंतर शिवसेना आणि भाजपमधील तणाव वाढतच चालला आहे. अशातच हरिभाऊ बागडे यांच्या घरावरील हल्ल्यानंतर औरंगाबादमध्ये आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला चांगलेच खडसावले आहे. दोन दिवसांत युतीबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.

दुसरीकडे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष राजू शिंदे यांनीही राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यावर 'तोडायची असेल, तर युती खुशाल तोडा' असे उत्तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे. यामुळे युतीतील तणावाची दरी वाढत चालली आहे. येत्या दोन दिवसांत ही यादवी आपले खरे रूप दाखवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

खडसेंची पाहणी...

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी औरंगाबादमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयावर शिवसेनेने हल्ला केला होता. तिथेही त्यांनी भेट दिली. त्यावेळी, हा हल्ला बागडे यांच्यावर नाही, तर भाजपवर आहे, असे खडे बोल त्यांनी सुनावले.

शिवाय चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

राठोड यांच्या भावावर हल्ला

शिवसेना-भाजप नगरसेवकांमधील राड्यानंतर, आता औरंगाबाद महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड यांच्यासह त्यांच्या भावावर अज्ञात लोकांनी रात्री हल्ला केला.

शहरातील चिश्तीया चौकामध्ये प्रमोद राठोड यांच्या श्रीयश या संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी काही लोक दगडफेक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रमोद राठोड आणि त्यांचे भाऊ प्रदीप राठोड हे तिथे गेले. त्यावेळी त्यांच्यावर बेल्ट आणि चेनने हल्ला करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close