S M L

11वर्षांनी 'साराभाई' येतायत भेटीला

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 03:28 PM IST

11वर्षांनी 'साराभाई' येतायत भेटीला

16 मार्च : टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय मालिका 'साराभाई VS साराभाई' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. स्टार वन वाहिनीवरील ही मालिका आता वेब सीरिजच्या माध्यमातून सर्वत्र झळकणार आहे.

या मालिकेचा दिग्दर्शक देवेन भोजानीनं 2012मध्ये सांगितलं होतं की ही मालिका काही पुन्हा नाही करणार. पण मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं, 'मालिका संपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या प्रोजेक्टमध्ये बिझी होते. पण मी कुठेही गेलो की, 'साराभाई VS साराभाई' मालिका कधी चालू होणार हा एकच प्रश्न मला विचारला जायचा. प्रेक्षकांचं मालिकेवरील प्रेम लक्षात घेऊन आम्ही पुन्हा एकदा मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन येणार आहोत.'

मालिकेचं शूटिंग या महिन्याच्या अखेरीस चालू होईल. मालिकेच्या वेब सीरिजमध्ये जुन्या कलाकारांसोबतच नवीन कलाकारही आहेत. आता ही मालिका 7 वर्ष पुढे जाणारेय. ही गोष्ट आहे इंद्रवदन साराभाई ( सतीश शहा ) आणि त्यांची बायको माया साराभाई ( रत्ना पाठक ) यांच्या कुटुंबाची. सुमित राघवन,रुपाली गांगुली आणि राजेश कुमार यांनीही या मालिकेत धमाल केलीय.

11 वर्षांपूर्वी सांस-बहू मालिकांच्या गर्दीत साराभाई चांगलेच भाव खाऊन गेले होते. वेब सीरिजमधून आता भेटणाऱ्या साराभाईंपुढे बरीच आव्हानं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close